या जगात एकसारखे दिसणारे 7 लोक असतात. आपल्यालाही अनेक वेळा आपल्या आजूबाजूला असा भास होतो, की या व्यक्तीला आपण कुठे तरी पाहिलं आहे. हिंदू चित्रपटसृष्टीतही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्याबद्दल चाहते काय गोंधळतात. या अभिनेत्रींचा लूक सारखा वाटतो. त्यामुळे त्या एकमेकींच्या Duplicate वाटतात. खरं तर इंडस्ट्रीमध्ये अशा अभिनेत्रींची एक लांबलचक यादी आहे ज्या एकमेकांच्या कार्बन कॉपी दिसतात. तुम्हाला आज आम्ही हिंदी इंडस्ट्रीतील अशा 3 अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत. ज्यांचे चेहरे एकमेकांसारखे आहेत. त्या तिघी एकमेकींसारख्या इतक्या सारखा दिसतात की, चाहते कायम गोंधळून जातात.
परवीन बाबी, झीनत अमान आणि टीव्ही अभिनेत्री दीपशिखा नागपाल या तीन अभिनेत्री आहेत ज्यांचे लूक अगदी एकसारखे दिसतात. लुक्सशिवाय या तिन्ही अभिनेत्रींमध्ये एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे त्यांची लव्ह लाईफ. तिन्ही अभिनेत्रींच्या आयुष्यात प्रेमाने दार ठोठावले, पण त्यांचे प्रेम जीवन अडचणींनी घेरले होते. काही लोकांना हवी असलेली व्यक्ती सापडली नाही तर काहींना ती सापडली आणि मग त्यांच्यापासून दूर गेले.
परवीन बाबी आणि झीनत अमान या दोघीही 60-70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. परवीन बाबी ही तिच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. तिने आपल्या फॅशन सेन्सने लोकांना वेड लावले होते. पण, तिने वयाच्या 50 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतल्याने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तिचे शेवटचे क्षण खूप वेदनादायी होते. शेवटच्या क्षणी ती पूर्णपणे एकटी राहिली. परवीन बाबीने लग्न केलं नाही, पण तिचे अफेअर नक्कीच होते, पण तिचे प्रेम पूर्ण होऊ शकलं नाही.
झीनत अमानबद्दल बोलायचं झालं तर, तिच्या आयुष्यात आधी संजय खान आला आणि नंतर मजहर खान. पण, तिचं लव्ह लाईफही अडचणींनी भरलेले होते.
झीनत अमानने स्वतः संजय खानबद्दल अनेक दावे केले होते. संजय खाननंतर मजहर खानने तिच्या आयुष्यात प्रवेश केला, पण मजहर खानसोबतचे तिचे वैवाहिक जीवनही अडचणींनी घेरले होते. मजहर खान 43 वर्षांचे असताना तिने या जगाचा निरोप घेतला.
दीपशिखा नागपाल देखील प्रेमाच्या बाबतीत फारशी भाग्यवान नव्हती. तिने दोनदा लग्न केले आणि दोन्ही लग्न अयशस्वी ठरली.
दीपशिखाने 1997 मध्ये जीत उपेंद्रसोबत लग्न केलं, पण 2007 मध्ये ते वेगळे झाले. यानंतर तिने केशव अरोरासोबत लग्न केलं. मात्र 2016 मध्ये दीपशिखाही केशवपासून विभक्त झाली.