बापरे! भयंकर अपघातानंतर अभिनेत्री रुग्णालयात दाखल

अपघातानंतर तब्बेत खूपच बिघडली आहे त्यांनंतर तिला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे.पण इतकी सेफटी असूनदेखील असं का घडलं नेमकं काय चुकलं असेल?

Updated: Aug 8, 2022, 12:21 PM IST
 बापरे! भयंकर अपघातानंतर अभिनेत्री रुग्णालयात दाखल title=

स्टंटवर आधारित इंडियन रिऍलिटी शो खतरो के खिलाडी च्या 12 व्या सीजन मधील खेळाडू रुबिना दिलैक हीचा स्टंट दरम्यान अपघात झाला आहे या अपघातानंतर रुबिनाची तब्बेत खूपच बिघडली आहे त्यांनंतर तिला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे . पण इतकी सेफटी असूनदेखील रुबिनासोबत असं का घडलं नेमकं काय चुकलं असेल?

 उंचावरून कोसळली रुबिना 

नुकत्याच झालेल्या एपिसोड मध्ये रोहित शेट्टीने सर्वांना एक टास्क दिला होता.ज्यानंतर कॅप्टनची निवड होणार होती पहिला टास्क हाईट अँड वॉटर होता.हा टास्क करताना रुबिना दिलैकच्या अंगावर बॅनर पडला त्यानंतर रुबीनाला श्वास घेणं अशक्य होऊ लागलं होत.या नंतर तिची तब्येत आणखी बिघडू लागली आणि रुबीनाला हॉस्पिटलमध्ये  दाखल करावं लागलं 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by   (@teamrubinadilaik)

   

रुबिना होती बिग बॅासची विनर 

रुबिना दिलैक एक स्ट्राँग स्पर्धक आहे सर्व टास्क ती उत्तमरीत्या खेळते याआधी रुबीनाला बिग बॉस मध्ये खेळताना पाहिलं आहे यावेळी सुद्धा सर्व टास्क रुबिनाने उत्तमरीत्या खेळले होते आणि ती या पर्वाची विनर राहिली होती 

सध्यातरी रुबिनावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत,त्यामुळे आता रुबिना कधी ठीक होते आणि पुढे ती खेळू शकणार का नाही हे अजून स्पष्ट करण्यात आलं नाही.