अखेर तीन दिवसांनंतर मराठी अभिनेत्रीनं उपोषण सोडलं

...म्हणून केलं होतं उपोषण  

Updated: Aug 12, 2019, 11:44 AM IST
अखेर तीन दिवसांनंतर मराठी अभिनेत्रीनं उपोषण सोडलं title=

अहमदनगर : अहमदनगरमधल्या साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी पुकारलेलं बेमुदत उपोषण अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मागे घेतलं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून दिलेल्या आश्वासनानंतर दीपाली सय्यद यांनी आपलं उपोषण मागे घेतले आहे. साकळाई उपसा सिंचन योजना मंजूर करून काम सुरू करावं या मागणीसाठी, ९ ऑगस्टपासून दीपाली सय्यद उपोषण करत होत्या. या योजनेमुळे श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातल्या दुष्काळी ३५ गावांना फायदा होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

साकळाई जलसिंचन योजनेकरिता उपोषण कर्त्यांशी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची सफल शिष्टाई ! साकळाई जल सिंचन योजनेच्या मागणीसाठी सौ. दिपाली भोसले-सय्यद ह्या उपोषणाला बसल्याबाबत माहिती मिळताच तातडीने पणन व वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा अहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांनी त्याठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचा व जलसंधारण मंत्री माननीय श्री.गिरिषजी महाजन यांच्याशी संपर्क साधून दिला. माननीय जलसंपदा मंत्री महोदयांनी दूरध्वनीवरून संवाद साधत या बाबत बैठकीसाठी सौ.दिपाली भोसले-सय्यद व संबंधित समिती ला बोलावले. पालकमंत्री या नात्याने मी त्यासाठीचा पाठपुरावा करत जी काही मदत लागेल ती करेल असे आश्वासन यावेळी मा.ना.प्रा.राम शिंदे साहेबांनी दिले. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांची सौ. दिपाली सय्यद यांचेसोबतची चर्चा सफल झाल्यामुळे सौ.दिपाली सय्यद यांनी पाणी पिऊन उपोषण सोडले. यावेळी शेतकरी व समिती सदस्य उपस्थित होते. . . #deepalisayed #aamranuposhan #saklai #uposhan #ahmednagar

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed) on

मात्र १ सप्टेंबरपर्यंत याबाबत योग्य निर्णय झाला नाही, तर २ सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा दीपाली सय्यद यांनी दिला आहे. गेल्या २० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. 

त्यांच्या या उपोषणाला कलाविश्वातून मोठ्या प्रमाणातून पाठिंबा मिळत आहे. अभिनेत्री मानसी नाईक, सीमा कदम, श्वेता परदेशी आणि सायली पराडकर यांनी पाठिंबा दिला आहे.