उर्फी जावेचा आत्महत्येचा प्रयत्न, म्हणाली "... म्हणून मला आयुष्य संपवायचंय"

अलीकडेच उर्फीने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींबाबत वक्तव्य केलं आहे.

Updated: Dec 29, 2021, 03:00 PM IST
उर्फी जावेचा आत्महत्येचा प्रयत्न, म्हणाली "... म्हणून मला आयुष्य संपवायचंय" title=

मुंबई : उर्फी जावेदची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ती आपल्या कपड्यांनी आणि आपल्या स्टाईलने सगळ्यांनाच नेहमी आश्चर्यचकीत करत असते. ज्यामुळे तिचा डिझायनर कोण असेल असा लोकांना नेहमी प्रश्न पडतो. उर्फी जावेदही बिग बॉस ओटीटी द्वारे प्रसिद्धीच्या झोतात आली. बिग बॉसच्या घरात असताना उर्फी तिच्या स्पष्टवक्तेपणा आणि कपड्यांमुळे चर्चेत आली.

अलीकडेच उर्फीने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींबाबत वक्तव्य केलं आहे. जे खरोखरच धक्कादायक आहे. उर्फीने सोशल मीडियावर यासंदर्भात बोलताना सांगितलं की, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यानंतर सोशल मीडियावर यागोष्टीबाबत चर्चांना आणखी उधाण आलं.

अलीकडेच एका सोशल मीडिया पोस्टद्वारे उर्फीने म्हटले आहे की, 'तुला माहित आहे का मी किती वेळा नापास झाली आहे? मला आता ते आठवतही नाही! मला कधी कधी असे वाटायचे की या संकटातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपले जीवन संपवणे.'

उर्फी म्हणते, 'माझं आयुष्य खरंच उद्ध्वस्त झालं होतं. अयशस्वी कारकीर्द, अयशस्वी नातेसंबंध आणि रिकामे खिसे मला असे वाटू लागले की, मी सगळं काही गमावलं आहे आणि मला जगण्याचा अधिकार नाही.'

उर्फी जावेद पुढे म्हणते, 'माझ्याकडे आजही जास्त पैसे नाहीत, मोठे यशस्वी करिअर नाही. मी अजूनही अविवाहित आहे पण माझ्यात आशा आहे. हेच कारण आहे की मी अजूनही जिवंत आहे आणि तुमच्यासमोर दिसतं आहे.'

उर्फीने या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, 'मला जिथे पोहोचायचे होते तिथे मी अजून पोहोचलेलो नाही पण चांगली गोष्ट म्हणजे मी त्या मार्गावर चालत आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फी जावेदबद्दल असे म्हटले जाते की, ती घरातून पळून ग्लॅमरच्या जगात आली होती. त्यावेळी, 'अनुपमा' या टीव्ही मालिकेत दिसलेला अभिनेता पारस कालनावतसोबतच्या अभिनेत्रीच्या अफेअरची चर्चा होती.