मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राची क्रेझ ही जगभरात आहे. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही प्रियांकाचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केल्यानंतर तिने रेस्टॉरेंटच्या इंडस्ट्रीमध्ये देखील प्रवेश केला आहे.
प्रियांका चोप्राचे न्यूयॉर्कमध्ये सोना हे भारतीय पदार्थाची मेजवानी असलेलं हॉटेल सुरू केलं आहे. यामध्ये एकापेक्षा एक असे दमदार पदार्थ तेथील लोकांना ती खाऊ घालतेय. या रेस्टॉरेंटमध्ये मुंबईचं स्ट्रीट फूड देखील मिळतं. विशेष म्हणजे मुंबईचा वडापाव आणि समोसा देखील येथे विकला जातो. पाणीपुरी, वडापाव आणि सामोसा हे येथील लोकप्रिय पदार्थ झाले आहेत.
प्रियांकाच्या रेस्टॉरेंटमध्ये वडापाव-समोसा
अलिकडेच प्रसिद्ध निर्माती लोला जेम्स यांनी देखील सोना या प्रियांकाच्या रेस्टॉरेंटला भेट दिली. यावेळी त्यांनी वडा पावची चव चाखली.
तसेच त्यांनी भेळ, चाट आणि बरेच पदार्थ खाल्ले. याविषयी लोला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, 'न्यूयॉर्कमध्ये असलेले हे सोना अप्रतिम चवीचे रेस्तराँ आहे. येथे रुचकर आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद नक्की घ्या.'
प्रियांकाच्या रेस्टॉरेंटमध्ये सेलिब्रिटींनी हजेरी
प्रियांकाच्या या हॉटेलमुळे अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांना आणि तेथील भारतीयांनाही अस्सल भारतीय पदार्थांची चव चाखायला मिळते आहे.आतापर्यंत रेस्टॉरेंटमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.
पण या हॉटेलमध्ये शिरताच अस्सल भारतीय आणि चवीष्ट पदार्थांचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर खिसा रिकामा करण्याची तयारी हवी. कारण मुंबईमध्ये जो वडा पाव अगदी महागातला 30 रुपयांच्या वर जात नाही. पण प्रियांकाच्या सोनामध्ये वडापाव खायचा असेल तर 14 डॉलर्स म्हणजे 1 हजार 39 रुपये खर्च करावे लागतील. तर सामोसासाठी देखील तेवढीच रक्कम मोजावी लागेल.