VIDEO : ही प्रसिद्ध अभिनेत्री ‘त्या’मुळे रस्त्यावर विकतीये डोसा!

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एका अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ तिच्या सिनेमाचा किंवा मालिकेचा नाही तर ती दोसा विकतानाचा आहे.

Updated: Oct 17, 2017, 10:13 AM IST
VIDEO : ही प्रसिद्ध अभिनेत्री ‘त्या’मुळे रस्त्यावर विकतीये डोसा! title=

मुंबई : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एका अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ तिच्या सिनेमाचा किंवा मालिकेचा नाही तर ती दोसा विकतानाचा आहे.

मल्याळम अभिनेत्री कविता ही ‘स्त्रीधनम’ या मालिकेतील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या काही काळापासून ही अभिनेत्री अभिनय न करता रस्त्यावर डोसे विकताना दिसत आहे.

एका चाहत्याने तिला गाडीवर डोसे करताना पाहिले आणि त्याचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला. तेव्हापासून हा व्हिडिओ सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला आहे. याबद्दल ती म्हणाली की, ट्रॅव्हल एजन्सीने माझ्या मुलाला ब्रिटनमध्ये शिक्षण व नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी महिन्याला एक लाख रुपये भरण्यास सांगितले होते. आम्ही वर्षभराची फी ट्रॅव्हल एजंटकडे जमा केली. पण, त्यानंतर आमची फसवणूक झाल्याचे आमच्या लक्षात आले’.

यातून पडण्यासाठी कलाक्षेत्रातील कोणत्याच व्यक्तीने आपली मदत न केल्याचेही तिने सांगितले. ती म्हणाली की, निर्माता दिनेश पानिकर आणि मनोज हे दोघं वगळता आम्हाला कोणीच मदत केली नाही. 

ती म्हणाली की, रस्त्यावर डोसे विकावे लागत असल्याची मला अजिबात लाज वाटत नाहीये. माझी हॉटेलमध्येही काम करण्याची तयारी आहे. मला केवळ माझ्या मुलाची काळजी वाटते, असेही कविता यांनी सांगितले.