मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या बायो'पिक' आलं आहे. बॉलिवूडमध्ये बायोपिक सिनेमे बनतात दिसत आहेत.पण आता बायोपिकची लोकप्रियता पाहता बायोपिकची वेब सिरीज देखील तयार होत आहे. हल्लीच सनी लिओनीची वेब सिरीज लाँच झाली आहे. आता लवकरच भारताची आयरन लेडी इंदिरा गांधी यांच्यावर बायोपिक तयार करण्यात येत आहे.
फिल्मफेअरमध्ये पत्रकार आणि लेखिका सागरिका घोष यांनी लिहिलेल्या इंदिरा गांधी यांच्यावरील पुस्तक 'इंदिरा : इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राइम मिनिस्टर' वर बायोपिक बनवली जात आहे. ही बायोपिक वेब सिरीजच्या माध्यमातून समोर येणार आहे. महत्वाचं म्हणजे या वेब सिरीजमध्ये इंदिरा गांधी यांची भूमिका अभिनेत्री विद्या बालन साकारत आहे. या वेब सिरीजची निर्मिती रोनी स्क्रूवाला करत आहेत. विद्या बालन या प्रोजेक्टमुळे खूप उत्साहित आहे. विद्या बालन म्हणते की, या वेब सिरीजमध्ये इंदिरा गांधी यांच्याबद्दल सांगण्यासारखं बरंच काही आहे. त्यामुळे या बायोपिकवर सिनेमा करण कठीण आहे. या प्रोजेक्टवर काम करायला सुरूवात केली आहे.
या प्रोजेक्टवर आता काम करायला सुरूवात केली आहे. मात्र आता याचे सिझन किती होणार हे अद्याप ठरलेले नाही. विद्या बालन या नव्या प्रोजेक्ट बद्दल उत्सुक आहे. आपल्याला माहितच आहे अभिनेत्री विद्या बालनचे महिला प्रधान सिनेमे अतिशय लोकप्रिय होतात.