Vikram Gokhale Death : सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोखले यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (legendary actor vikram gokhale passed away at pune dinnath mangeshkar hospital at pune)
त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीये. विक्रम गोखले (vkram gokhale) यांच्या जाण्याने सर्व कलाकार त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आहेत.अभिनेते अनुपम खेर (anupam kher) यांनी विक्रम गोखलेंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (vikram gokhale last video ) या व्हिडिओमध्ये विक्रम गोखले एक कविता म्हणताना दिसत आहेत.. यावर अनुपम खेर यांनी त्यांचा एक किस्सा सुद्धा सांगितलंय ते म्हणतात ''विक्रम गोखलेंनी हि कविता सादर केली ती अपूर्ण होती आणि म्हणून मी त्यांना मेसेज केला यावर त्यांनी उत्तर दिल कि आयुष्य सुद्धा अपूर्णच आहे'' आणि हे सगळं १२ दिवस आधीच घडलआहे आणि आज त्यांच्या जाण्याच्या बातम्या समोर येताहेत.. (हा व्हडिओ अनुपम खेर यांनी तेव्हा ट्विट केलं होतं जेव्हा मीडियामध्ये विक्रम गोखलेंच्या निधनाच्या बातम्या सुरु होत्या )
I got this incomplete video from #VikramGokhale 12days back. I called him & told him that the poem is incomplete. He laughed & replied,“Life incomplete है मेरे दोस्त!” News of his death has deeply saddened me. He was a very dear friend! BRILLIANT actor & person! ओम शांति! pic.twitter.com/4TzgO3dDHn
— Anupam Kher (@AnupamPKher) November 24, 2022
त्यांनी अनेक मराठी,हिंदी सिनेमा, मालिकांसह रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची छाप उमटवली.
विक्रम गोखले यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही मनोरंजनाच्या क्षेत्रात त्यांच्या अभिनयानं वर्चस्व गाजवलं. त्यांनी आतापर्यंत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या . अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केलं. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आघात' या सिनेमाचं समीक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. 'अनुमती' या 2013 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं
'मॅरेथॉन जिंदगी' , 'आघात' हा त्यांनी दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट, 'आधारस्तंभ', 'आम्ही बोलतो मराठी', 'कळत नकळत', 'ज्योतिबाचा नवस', 'दरोडेखोर', 'दुसरी गोष्ट' , 'दे दणादण', 'नटसम्राट', 'भिंगरी' , 'महानंदा' ,' माहेरची साडी' आणि 'वासुदेव बळवंत फडके' त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत.
'अनुमती' या चित्रपटातील भूमिकेसाठी 2313 सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार (2015), चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.