Johnny Lever- Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची बॉडी पाहिल्यानंतर तरुणांनाही लाज वाटते कारण त्यानं वयाच्या 50 व्या वर्षी स्वत: ला जसं फिट ठेवलं आहे तसं आजकाल खूप कमी लोकं असतात. गेल्या अनेक काळापासून तो या चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यात अमीषा पटेल ही त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, अचानक हृतिक रोशन आजारी पडला. तेव्हा काय तर जॉनी लिवर यांनी त्याच्यावर मंत्रोच्चार करून ते दूर केलं. मात्र, मंत्रोच्यार केल्यानं कोणताही आजार ठीक होत नाही हे वैज्ञानिकांनी सिद्द करून दाखवलं आहे.
जॉनी लिवरनं हृतिक रोशनसोबत अनेक चित्रपट केले. त्यापैकी एक म्हणजे 'कहो ना प्यार है'. यात अभिनेत्यानं डबल रोल साकारले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून देखील चांगली प्रतिक्रिया मिळाली होती. जवळपास 10 कोटींमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 80 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. आता या चित्रपटांतर राकेश रोशन, हृतिक आणि जॉनी लिवर एका कार्यक्रमासाठी नाशिकला गेले होते. तेव्हा एक चमत्कार झाला होता.
जॉनी लिवर यांनी एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले "हृतिक रोशनचा कहो ना प्यार है हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मी देखील काम केलं होतं. प्रदर्शनाच्या एका आठवड्यानंतर आम्ही नाशिकला गेलो. तोपर्यंत सगळेच हृतिकचे चाहते झाले होते. जेव्हा आम्ही विमानातून उतरत होतो तेव्हा मी राकेशला म्हटलं की आता तरी आनंदी हो, असं तोंड का पडलंय? तर त्यांनी सांगितलं की नाही यार, हृतिकची एक समस्या आहे. तर मी त्यांना विचारलं की काय होतंय? त्यानी सांगितलं की हृतिकला लहानपणापासून लिवरला सूज येते आणि त्याच्या बॉडी होत नाही. तो असाच बारीक राहतो. खूप गोळ्या खातो... पण काय सांगू. तर लगेच तो म्हणाला की अरे तू माझ्यावर केलं होतंस ना, आठवण आहे? कोयला चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, ते जीजसचं नाव घेऊन काही तरी केलं होतंस ना. तसं त्याचं काही करु शकतोस?"
हेही वाचा : 'लव सेक्स और धोखा 2' साठी दिग्दर्शकानं का घेतले तब्बल 6000 कलाकारांचे ऑडिशन? समोर आलं कारण
जॉनी लिवरनं सांगितलं की "मी म्हणालो की हा करेन. आता करतो. माझ्या मुलासारखा आहे तो पण. मी त्याला बोलावलं आणि सूज विषयी विचारलं. मग जीजसचं नाव घेत मी म्हणालो... जा. राकेश रोशनला विश्वास होता. मी बोलतो त्यावर पवित्र आत्मा काम करते आणि मी हात लावणं, विश्वास महत्त्वाचा असतो. तो दिवस आणि आजचा दिवस, हृतिकनं कोणतं औषध खाल्ल नाही."