मुंबई : 'सपना बाबूल का : बिदाई' फेम टी. व्ही. अभिनेत्री सारा खान सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेमध्ये अत्यंत सभ्य भूमिका साकारलेली सारा रियल लाइफमध्ये फार ग्लॅमरस आहे. त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यात ती नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. त्यामुळे तिला छोट्या पडद्यावरची कंट्रोवर्सी क्वीन म्हणून ओळखले जाते. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सारा आणि तिची बहिण आयरा श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. दोघी सुद्धा मस्तीच्या मुडमध्ये असताना आयराने साराचा बाथटब मधील व्हिडिओ शूट केला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. आपल्या चूकीची जाणीव होताच तिने तो व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट केला आहे.
परंतू, बाथटबमधील व्हिडिओ डिलीट करायच्या आधीच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ तर डिलीट झाला पण कित्येकांनी स्क्रिन शॉट काढून तो शेअर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी साराला चांगलेच ट्रोल केले आहे. फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिने असे कृत्य केले असल्याचा आरोप तिच्यावर होत आहे.
नेटकऱ्यांकडून होत असलेल्या आरोपांना फेटाळून लावत. तिने हे सर्व चुकून झाले असल्याचे सांगितले आहे. सारा आणि विवाद यांचं फार जूनं नातं आहे. या आधी सुद्धा अनेक कारणांमुळे तिला ट्रोल करण्यात आले होते.