कोण आहे उर्फी जावेदचा ड्रेस डिझायनर? त्याला पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल आश्चर्य

उर्फी जावेदसाठी हा डिझायनर तयार करतोय ड्रेस...   

Updated: Dec 25, 2021, 02:54 PM IST
कोण आहे उर्फी जावेदचा ड्रेस डिझायनर? त्याला पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल आश्चर्य title=

मुंबई :  अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed ) बिग बॉस ओटीटीमध्ये प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधलं. उर्फीचं वेगळेपण म्हणजे तिचा फॅशन सेन्स. बिग बॉसच्या घारतून बाहेर आल्यानंतर ती कायम तिच्या विचित्र ड्रेसमुळे चर्चेत आली. काही युझरना तिचा फॅशन सेन्स आवडतो, पण काही मात्र उर्फीला तिच्या विचित्र ड्रेसमुळे  ट्रोल करतात. उर्फीला ज्या ड्रेसमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, ते ड्रेस कोण डिझाईन करतं असा  प्रश्न देखील तिला सोशल मीडियावर विचारण्यात आला. 

खुद्द उर्फीने युझरच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. सर्व चाहत्यांचे प्रश्न लक्षात घेऊन उर्फी जावेदने आपल्या नवीन पोस्टमध्ये तिच्या निळ्या आउटफिटच्या डिझायनरचा खुलासा केला आहे. ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फीने इन्स्टाग्राम अकाउंटवर निळ्या रंगाचे कपडे घातलेला एक फोटो पोस्ट केला आहे. तिने सर्वात शेवटी ज्याने ड्रेस डिझाइन केला आहे, त्याचा फोटो पोस्ट केला आहे. उर्फीचा डिझायनर दुसरा तिसरा कोणी नसून छोटा उंदीर आहे...   त्यामुळे उर्फी म्हणते, ड्रेसचा डिझायनर तो असल्यामुळे त्याच्यावर आरोप करा, माझ्यावर नको... 

सांगायचं झालं तर जेव्हा उर्फी जावेदला समजले की ती तिच्या फॅशन सेन्समुळे लोकप्रिय होऊ शकते. तेव्हापासून तिने फॅशन दाखवण्याची एकही संधी सोडलेली नाही. उर्फी तिच्या विचित्र कपड्यांमुळे कायम चर्चेत असते.