'माझ्याकडे स्वत: चं डोकं नाही'; खान कुटुंबाविषयी बोलताना असं का म्हणाला आयुष शर्मा?

Aayush sharma :  आयुष शर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या चित्रपटापासून खासगी आयुष्यापर्यंत अनेक गोष्टींवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 18, 2024, 02:17 PM IST
'माझ्याकडे स्वत: चं डोकं नाही'; खान कुटुंबाविषयी बोलताना असं का म्हणाला आयुष शर्मा? title=
(Photo Credit : Social Media)

Aayush sharma : बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मानं त्याच्या करिअरमध्ये अजून दोन चित्रपट केले असून ते काही सुपरहिट ठरले नाही. आता तो बऱ्याच काळानंतर रुसलान या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. तो सतत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान, आयुष शर्मानं त्याच्या आणि खान कुटुंबातील बॉन्डिंगवर स्पष्टपणे वक्तव्य केलं आहे. 

आयुष शर्मानं नुकतीच 'न्यूज 18' ला मुलाखत दिली होती. यावेळी त्यानं सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाविषयी मोकळेपणानं वक्तव्य केलं आहे. यावेळी सलमान खानची स्तुती करत आयुष म्हणाला, "तो जेव्हाही कोणाला पाठिंबा देतो तेव्हा मनापासून करतो. जेव्हा माझ्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा मला आशा नव्हती की तो हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करेल." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे याविषयी बोलत आयुष म्हणाला, त्यानं दिलेल्या कॅप्शननं माझं मन भरुन आलं. जेव्हा कोणी तुम्हाला शिकवतं, गाइड करतं... त्याचं व्यक्तीनं जर तुमची स्तुती केली तर खूप मस्त वाटतं. त्याचं कारण हे नाही की मी त्याचा मेहूणा आहे तर यामुळे की मी त्याचा विद्यार्थी आहे. त्यानं केलेली स्तुती हे माझ्या हृदयाच्या जवळ आहे. 

काय म्हणाला होता सलमान खान?

सलमाननं आयुषच्या आगामी चित्रपटानं ट्रेलर शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे की 'आयुषचं रुसलानसाठी असलेली खूप मेहनत, प्रयत्न आणि समर्पण पाहू शकतोय. काहीही होऊ दे, पण तुझं जे बेस्ट आहे ते देत रहा. मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. देवाचा आशिर्वाद तुझ्यावर राहू देत आणि तुला खूप खूप शुभेच्छा.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!

पुढे आयुषला विचारण्यात आलं की लोकांना त्याच्याविषयी असलेली सगळ्यात मोठा असा गैरसमज काय आहे? त्यावर उत्तर देत आयुषनं सांगितलं की "माझ्याकडे स्वत: चं डोकं नाही. लोकांना वाटतं की माझ्याविषयी सगळे निर्णय हे खान कुटुंब घेतं, पण हे सत्य नाही." आयुषनं त्याशिवाय त्याच्या डेब्यू चित्रपट लवयात्रीमधील परफॉर्मन्सला खराब म्हटलं आहे. त्याला पहिल्या चित्रपटासाठी ट्रोल देखील करण्यात आलं होतं. आयुष शर्माच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर त्यानं 2014 मध्ये सलमान खानची बहीण अर्पिता खानशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.