'मामा ठीक आहे, पण... ' गोविंदाला भेटायला न येण्यामागचं कृष्णाने सांगितलं कारण

अभिनेता गोविंदाला 1 ऑक्टोबर रोजी स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून गोळी लागली. अनेकांनी गोविंदाच्या तब्येतीबद्दल विचारणा केली, पण या दरम्यान त्याचा भाचा अभिनेता कृष्णा अद्याप मामाला भेटायला गेला नाही. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 2, 2024, 02:17 PM IST
'मामा ठीक आहे, पण... ' गोविंदाला भेटायला न येण्यामागचं कृष्णाने सांगितलं कारण  title=

बॉलिवूड अभिनेता गोविंदाला अचानक गोळी लागल्याची बातमी समोर येताच एकच गोंधळ उडाला. अभिनेता आपली रिव्हॉल्वर साफ करत असताना त्याला गुडघ्यात गोळी लागली. यानंतर चाहत्यांना गोविंदाच्या तब्येतीची काळजी वाटू लागली. या दरम्यान गोविंदाचा भाचा कृष्णाने मामाच्या तब्बेतीची माहिती दिली. पण तो स्वतः गोविंदाला भेटायला गेला नाही. गोविंदा आणि कृष्णाचा वाद सर्वांनाच माहित आहे. या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला की, काय? अशी चर्चा रंगली आहे. 

कॉमेडियन कृष्णा अभिषेकने अद्याप मामा गोविंदाची भेट घेतली नाही. या मागचं कारण काय? अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे. असं असताना कॉमेडियन कृष्णा अभिषेकने इंस्टाग्रामवर लिहिलं आहे की,'मामाची तब्येत आता बरी आहे. तुमच्या सगळ्या प्रार्थना आणि प्रेमासाठी मनापासून आभार. त्यांची तब्येत लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करतो.' पुढे कृष्णा लिहितो की, भगवान खूप दयाळू आहे. कृपया प्रार्थना चालूच ठेवा.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Krushna Abhishek (@krushna30)

कृष्णाने का घेतली नाही गोविंदाची भेट गोविंदाची पहिल्याच दिवशी कृष्णाची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाह यांनी भेट घेतली. अभिनेता गोविंदाला क्रिटी केअरमध्ये जाऊन भेटले आणि त्याच्या तब्येतीची चौकशी केली. कृष्णाने मीडियाशी बोलताना सांगितले की, 'ते आता बरे आहेत. कश्मीरा त्यांना भेटून आली. मी आता ऑस्ट्रेलियाला आहे. काही दिवसांतच मला सुट्टी मिळेल. '

गोविंदाचा ऑडिओ मेसेज 

त्याचवेळी गोविंदाने त्याच्या चाहत्यांना त्याच्या तब्येतीबाबत अपडेटही केले होते. आता तो बरा असल्याचे अभिनेत्याने एक निवेदन जारी केले. तो म्हणाला होता, “माझे चाहते, माझे आई-वडील आणि देव यांच्या आशीर्वादाने मी आता चांगली कामगिरी करत आहे. मला गोळी लागली होती, जी आता काढून टाकण्यात आली आहे.” ऑडिओ संदेशात ते म्हणाले, “मी इथल्या डॉक्टरांचे आभार मानतो, डॉ. अग्रवाल जी. तुमच्या प्रार्थनेबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.”

पायाला लागली गोळी 

गोविंदा एका शोसाठी कोलकाता येथे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तो परवाना असलेले रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत असताना रिव्हॉल्व्हर खाली पडला आणि चुकून त्याचा ट्रिगर दाबला गेला. त्यामुळे त्याच्या पायाला गोळी लागली. यानंतर अभिनेत्याला रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी त्याची गोळी काढली असून सध्या तो विश्रांती घेत आहे. गोविंदाच्या भावाने सांगितले की, त्याला येत्या 2-3 दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल.