मुंबई : एखादी मुलगी जेव्हा जवळच्या मित्राला न दुखावता त्याचे प्रपोजल रिजेक्ट करु इच्छिते किंवा असलेले नाते पुढे नेऊ इच्छित नाही तेव्हा ती काही ना काही सबबी पुढे करु लागते. त्या सबबी काहीशा मजेशीर असतात. यापैकी काही सबबी तुम्ही देखील कधी ना कधी वापरल्या असतील. तर मग जाणून घेऊया मुलांना टाळण्यासाठी मुली नेमक्या काय युक्त्या करतात...
प्रेमात पडतोय किंवा काहीतरी वेगळं जाणवल्यावर लगेचच मुलींना ही सबब सुचते. सर्वांत पहिली सबब म्हणजे- तू मला भावासारखा आहेस. मी तुला कधी त्या नजरेने पाहिले नाही. ही सबब ऐकल्यानंतर मुले स्वतःलाच थोडे आवरते घेतात.
मुलांचा पाठलाग सोडवण्यासाठी मुली हे वाक्य ढालीसारखे पुढे करतात. ते म्हणजे- माझा बॉयफ्रेंड आहे. मुलींची ही ढाल अगदी योग्य काम करते. मुलींकडून हे वाक्य ऐकताच मुले मागे हटतात. त्यांना कळतं की, मुलगी त्यांच्यात इंटरस्टेट नाहीये.
पूर्वी प्रेमात धोका मिळालेल्या मुलींची ही मनस्थिती असते. जेव्हा कधी एखादा मुलगा त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मुली सर्रास हे वाक्य वापरतात- सगळी मुले सारखीच असतात.
ही अगदी भावनिक सबब. मुलाने प्रपोज करताच मुलींची ही सबब ठरलेली असते.
प्रेमात पडल्यानंतर करिअरचे नुकसान होईल. याची उपरती मुलींना मुलांनी प्रपोज केल्यावर किंवा इंटरेस्टट दाखवल्यावर होते. त्यामुळे मला यात पडायचे नाही. आधी करिअर मग बाकी सगळं, ही सबब पुढे केली जाते.
मुलांनी इंटरेस्टट दाखवल्यावर किंवा प्रपोज केल्यावर मुली हे जादूई वाक्य उच्चारतात- मी तशी मुलगी नाहीये. त्यामुळे समोरची व्यक्तीही गोंधळते. त्यांनाही वाटू लागते की, विचार करतोय तशीच आहे ना ही नक्की?