Breast Pain: मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा मासिक पाळी दरम्यान महिलांना प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. यामध्ये पोटदुखी, पाठदुखी तसंच हाता पायांमध्ये वेदना होणं यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मासिक पाळी येण्यापूर्वी शरीरात काही बदल होतात, ज्यामुळे मासिक पाळी येणार असल्याचा अंदाज लावता येतो. या बदलांमध्ये मूडमधील बदल, शरीर जड वाटणं, स्तनांमध्ये वेदना या गोष्टी महिला अनुभवतात.
दरम्यान यामध्ये महिलांना जाणवणारी एक समस्या असेत ती म्हणजे स्तनांमधील वेदना. स्तनातील वेदना ही तक्रार सर्व मुलींना जाणवत नाही. पण काही मुली अशा असतात ज्यांना मासिक पाळी येण्याआधी या समस्येचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, मासिक पाळीपूर्वी स्तनांमध्ये वेदना का होते हे जाणून घेणं गरजेचं आहे.
मासिक पाळीपूर्वी स्तन दुखण्यामागे फॅटी अॅसिड देखील जबाबदार असू शकतं. जेव्हा शरीराच्या पेशींमधील फॅटी ऍसिड्सचं असंतुलन होतं त्यावेळी स्तनाच्या आत हार्मोन्स सर्क्युलेशनमध्ये मदत करणाऱ्या टिश्यूंवर परिणाम होऊ शकतो. यामुळे देखील पहिल्या ब्रेस्ट दुखण्याची समस्या पुन्हा उद्भवू शकते.
मासिक पाळीपूर्वी स्तन दुखण्यामागे खाण्याच्या काही वाईट सवयीही कारणीभूत ठरू शकतात. महिलांनी मासिक पाळीपूर्वी कॉफी, चहा, चॉकलेट या पदार्थांचं जास्त प्रमाणात सेवन करू नये. याशिवाय आहारातही काही बदल करणं फायदेशीर ठरू शकतं.
आपल्या शरीरात प्रामुख्याने एस्ट्रोजेन हार्मोन्स आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स आढळतात. ज्यामुळे मासिक पाळीपूर्वी ब्रेस्टमध्ये वेदना होऊ शकतात. ज्यावेळी या दोन्ही हार्मोन्सचं असंतुलन होतं, त्यावेळी ब्रेस्ट डक्ट आणि ग्रंथींचा आकार वाढू लागतो, ज्यामुळे स्तनामध्ये वेदना होऊ शकते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)