मुंबई : सध्या जगभरात कोरोनाची अनेक प्रकरणं नोंदवली जातायत. या प्रकरणांमागे कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याचं सांगितलं जातंय. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीला ओमायक्रॉनचा दोनदा संसर्ग होऊ शकतो का हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. तर याचं उत्तर होय, असं असू शकतं.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीला दोनवेळा ओमायक्रॉनचा संसर्ग होऊ शकतो. मात्र दुसऱ्यांदा झालेला संगर्ग फार धोकादायक नसू शकतो.
अमेरिकेच्या एपिडेमियोलॉजिस्ट एरिक फीगल-डिंग म्हणाले की, ओमायक्रॉनचा पुन्हा संसर्ग होणं शक्य आहे. जर पहिल्यांदा झालेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची तीव्रता कमी असेल आणि त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती पुरेशी मजबूत झाली नसेल तर संसर्ग पुन्हा होण्याची शक्यता आहे. म्हणजेचओमायक्रॉनच्या पुन्हा होण्याचं एक कारण तुमची अत्यंत कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती देखील असू शकते.
एरिक फीगल-डिंग पुढे म्हणतात की, जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे अशा लोकांनी सावध राहिलं पाहिजे.
दरम्यान ज्यांना कोरोनाचा एकदा संसर्ग झाला आहे त्यांना देखील पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे. इतकंच नाही त्या लोकांचं लसीकरण झालं आहे त्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मात्र लसीमुळे कोरोनाची तीव्रता कमी होते आणि मृत्यूचा धोकाही टळतो.
सध्याच्या कोरोनाच्या लाटेमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट सक्रिय स्वरूपात. त्यामुळे जर लोकांना Omicron चा पुन्हा संसर्ग होत असेल, तर याचा अर्थ असा होतो की त्यांना हा संसर्ग फार कमी वेळात होतोय. संसर्गानंतर शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमीत कमी सात ते नऊ महिने टिकली पाहिजे.
रटगर्स न्यू जर्सी मेडिकल स्कूल आणि रटगर्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील एपिडेमिओलॉजी विभागाचे प्राध्यापक स्टॅनले वेस यांच्या सांगण्यानुसार, "ज्या लोकांना पूर्वी कोरोनाच्या जुन्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग होऊ मिळू शकतो. तर लोकांना दोनदा ओमिक्रॉनचा संसर्ग देखील होऊ शकतो."