Clove For Diabetic Patient: शुगर हा एक आजार आहे जो सामान्यतः आपल्या वाईट जीवनशैलीमुळे (Unhealthy Lifestyle) आणि अनहेल्दी आहारामुळे (Unhealthy Food) होतो. वाईट जीवनशैली आणि फास्टफुड अन्न हे याचे पहिले कारण आहे. परंतु बर्याच लोकांमध्ये शुगर हा आजार अनुवांशिक देखील आहे. जगभरात शुगर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. साखरेच्या आजारात इन्सुलिनचा मोठा वाटा असतो. इन्सुलिन शरीरातील रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) राखते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्वयंपाकघरातील मसाल्यांमध्ये समाविष्ट असलेली एक खास गोष्ट साखरेच्या रुग्णाला आराम देऊ शकते. गरम मसाल्यांमध्ये समाविष्ट असलेल्या लवंगांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात, जे साखरेच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत.
गरम मसाला म्हणून वापरल्या जाणाऱ्या लवंग मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरु शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. लवंगमध्ये मधुमेहविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे साखरेवर प्रभाव दर्शवतात. लवंग तेल इन्सुलिन आणि ग्लुकोजची पातळी राखण्याचे काम करते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म स्वादुपिंडाला अनुकूल बनवण्यास मदत करतात. स्वादुपिंड हा शरीराचा एक भाग आहे जो इन्सुलिनच्या निर्मितीसाठी जबाबदार असतो.
लवंग औषधी म्हणून वापरण्यासाठी, सर्वप्रथम, एक चमचा लवंग बारीक करुन घ्यावी लागते, नंतर ती एक कप पाण्यात टाकून सुमारे 10 मिनिटे उकळण्यासाठी सोडा. यानंतर त्यात अर्धा चमचा चहा पावडर टाकून थोडावेळ ठेवा आणि त्यानंतर थंड द्रव गाळून चहाप्रमाणे रोज प्या. असे केल्याने हळूहळू रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येईल. यासोबत लवंगाचा उपयोग शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी औषध म्हणून केला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की अनेकवेळा लवंगाचा उपयोग सांधेदुखीच्या उपचारातही केला जातो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याची अमलबजावणी करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)