गायत्री पिसेकार, झी मीडिया : Pad Vs Tampons : आपल्या देशात तसं टॅम्पून्स वापराचं प्रमाण फार कमी आहे. त्यासाठी काही गोष्टी कारणीभूत आहेत. टॅम्पून्स वापराविषयी महिलांमध्ये जागृती ( use of tampons) होणं गरजेचं आहे. तसेच टॅम्पून्सचे दर सॅनिटरी पॅड्सच्या तुलनेत (sanitary pads) जास्त आहेत. मात्र, टॅम्पून्सच्या वापराने लिकेजेस सारख्या समस्यांपासून नक्कीच मुक्ती मिळू शकते.
दर महिन्याला पाळी ( Periods) येणे ही नैसर्गिक बाब आहे. मात्र, पाळीच्या दिवसातील अधिक रक्तस्त्रावामुळे महिलांच्या रोजच्या जिवनातील शारिरीक हालचालींवर मर्यादा येतात. तसेच सॅनिटरी पॅडच्या वापरामुळे लिकेजमुळे (sanitary pads leaks) कपडे डागाळण्याचं टेन्शन प्रत्येक महिलेला असतं.
शारिरीक स्वच्छतेचा विचार करून दर 4-5 तासाला सॅनिटरी पॅड बदलणं आणि त्या पॅडची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणं किंवा
पॅड कागदात गुंडाळून कचऱ्यात टाकणं हा सगळा त्रासदायक प्रकारातून प्रत्येक महिलेला जावंच लागते. मात्र, टॅम्पून्सच्या वापराने या त्रासापासून काही प्रमाणात सुटका मिळू शकते.
टॅम्पून्स वापरणं न वापरणं हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय आहे. पाळी यायला सुरुवात झाल्यापासून मुली टॅम्पून्स वापरू शकतात. टॅम्पून्स वापरणं हे तुमच्या किती सोयीचं आहे त्यावर हे अवलंबून आहे. टॅम्पून्स वापरून तुम्ही सर्व प्रकारच्या शारिरीक हालचाली (Physical Activity) करू शकता. सॅनिटरी पॅड लावून स्विमींग करणं अशक्य असतं. मात्र, टॅम्पून्स वापरून स्विमींगही करता येऊ शकतं.
पहिल्यांदा टॅम्पून्स वापरणं सुरुवातीला थोडं कठीण वाटू शकतं. मात्र, एकदा वापरल्यावर टॅम्पून्स इंन्सर्ट केल्याचं जाणवतं ही नाही. आता टप्प्याटप्पाने जाणून घेऊया टॅम्पून्स ( How to Import tampons ) कसं इंन्सर्ट करायचं?
correct age of using tampons and simple tips to use tampoons