कोविशील्ड बनवणाऱ्या कंपनीकडून बूस्टर डोससाठी मंजूरीची मागणी, मिळालं 'हे' उत्तर

भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरलच्या तज्ज्ञांच्या समितीने महत्त्वाची माहिती दिली आहे.

Updated: Dec 11, 2021, 07:52 AM IST
कोविशील्ड बनवणाऱ्या कंपनीकडून बूस्टर डोससाठी मंजूरीची मागणी, मिळालं 'हे' उत्तर title=

मुंबई : कोरोनाच्या बूस्टर डोजसाठी कोविशिल्डच्या मंजूरीला सीरम इंस्टीट्यूटच्या (Serum Institute) अर्जावर रिव्हू करण्याऱ्या भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरलच्या तज्ज्ञांच्या समितीने महत्त्वाची माहिती दिली आहे. या समितीने स्थानिक क्लिनिकल ट्रायल डेटा आणि बूस्टर डोस मंजुरीचे प्रस्ताव सादर करण्याची शिफारस शुक्रवारी केलीये. 

सीरम इन्स्टिट्यूटने बूस्टर डोससाठी मान्यता मागितली होती

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) मधील सरकारी आणि नियामक व्यवहार संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी 1 डिसेंबर रोजी भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल (DCGI) कडे अर्ज करून कोविशील्डला कोरोना विषाणू संसर्गाविरूद्ध बूस्टर डोस म्हणून मान्यता मागितली होती. 

ते म्हणाले, भारतात कोविशील्डची कमतरता नाही आणि नवीन व्हेरिएंट आल्याने, ज्यांना आधीच 2 डोस मिळाले आहेत त्यांच्यासाठी बूस्टर डोसची मागणी आहे. ब्रिटनच्या औषध आणि आरोग्य सेवा उत्पादने नियामक एजन्सीने आधीच AstraZeneca ChAdOx1-S/nCoV-19 लसीचा बूस्टर डोस मंजूर केला आहे.

बूस्टर डोसची वाढती मागणी

अर्जात म्हटल्याप्रमाणे, 'तुम्हाला माहित आहे की आता आपल्या देशात कोविशील्डची कमतरता नाही. नवीन व्हेरिएंटशी लढणाऱ्या आणि दोन डोस घेतलेल्या लोकांकडून बूस्टर डोसची मागणी दिवसेंदिवस वाढतेय.'

सरकारने संसदेत ही माहिती दिली

केंद्र सरकारने संसदेत म्हटलं की, कोविड-19विरोधी लसीवरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट आणि लसीकरणावरील राष्ट्रीय तज्ञ गट कोरोना विषाणू लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता आणि कारण आणि कारणाबाबत वैज्ञानिक पुराव्यांवर चर्चा करत आहेत.