मुंबई : वजन घटवण्यासाठी व्यायामासोबत डाएट प्लानही गरजेचा असतो. काय खावे अथवा काय नाही खावं यासोबतच कधी खावं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. अनेकदा वजन घटवण्याच्या नादात लोक रात्रीचे जेवण करणे टाळतात. यामुळे मध्यरात्री भूक लागते. याचा परिणाम जंक फूड खाण्याला पसंती दिली जाते आणि कॅलरीज वाढतात. यामुळे असे काही पदार्थ आहेत जे रात्री खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
रात्रीच्या वेळेस चेरी खाल्ल्याने केवळ पोटच भरत नाही तर चांगली झोपही येते. चेरीमध्ये मेलाटोनिन नावाचे हार्मोन असते ज्यामुळे चांगली झोप येते. यात अँटी ऑक्सिंडटही मिळते.
रात्रीच्या वेळेस दही खाल्ल्याने शरीराला प्रोटीन मिळते. प्रोटीनमुळे पोटही भरते आणि मांसपेशीही अधिक सक्रिय होतात. याशिवाय रात्रीच्या जेवणात उकडलेले अंडे खाल्ल्यास वजन कमी होते. एका अंड्यात ७८ कॅलरीज असतात. तसेच अंडे पोषकतत्वांनी भरलेले असते. वजन कमी करण्यासाठी हे उत्तम भोजन आहे.
बदामध्ये पाच ग्रॅम प्रोटीन असते जे संपूर्ण रात्रभर मांसपेशींना रिपेअर करण्याचे काम करते. तसेच फायबरमुळे रात्रभर भूक लागत नाही. याशिवाय बदाम शरीराची चरबी कमी करण्यासाठी सुपरफूड मानले जाते. फायबरयुक्त पदार्थांच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.