अंडर गारमेंट्सची एक्सपायरी डेट असते का? तज्ज्ञांकडून याबाबत धक्कादायक खुलासा

आपल्याला तर हे माहित आहे की, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची एक्सपायरी डेट असते. परंतु गारमेंट्सची एक्सपायरी डेट असते हे तुम्हाला माहितीय का?

Updated: May 21, 2022, 04:07 PM IST
अंडर गारमेंट्सची एक्सपायरी डेट असते का? तज्ज्ञांकडून याबाबत धक्कादायक खुलासा title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : आपल्याला तर हे माहित आहे की, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची एक्सपायरी डेट असते. जसे की औषध, दुध, खाण्याच्या वस्तु इत्यादी. परंतु तुम्ही कधी अंडर गारमेंट्सची एक्सपायरी डेट असते, असं एकलं आहे का? वैद्यकीयदृष्ट्या असा कोणताही पुरावा नसला तरी जुन्या गारमेंट्सचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो हे निश्चित. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगतो की, अंडरवेअर किती दिवस वापरता येईल. यासोबतच याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे. सर्वप्रथम, आम्‍ही तुम्‍हाला अंतर्वस्त्रे कधी बदलायला हव्यात याबद्दल सांगतो.

ते सैल झाल्यास बदला

एनवाययू स्कूल ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर फिलिप टिएर्नो यांच्या मते, कोणत्याही अंडरगारमेंटची एक्सपायरी डेट नसते. पण जर तुमचे अंडरगारमेंट सैल झाले असेल तर तुम्ही ते बदलले पाहिजेत.

अंडर गारमेंट्स वर्षाला बदलले पाहिजेत

अंडर गारमेंट्सबाबत तज्ज्ञांचा  सल्ला आहे की, वर्षभरात अंडर गारमेंट्स बदलायला हव्यात. जर आपण दररोज अंडरगारमेंट घालतो, तर ते 6 महिन्यांत बदलणे योग्य आहे. यामुळे अनेक प्रकारचे संक्रमण टाळता येऊ शकते.

ऍलर्जी आणि संसर्ग होण्याचा धोका असतो

NYU च्या Longone Health चे MD, Terneh Shirjien यांनी सांगितले की, असा कोणताही वैद्यकीय पुरावा अद्याप सापडलेला नाही, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, जुने अंडरवेअर परिधान केल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होते. पण हो, खूप जुन्या अंडरगारमेंटमुळे अॅलर्जी आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो.

अंगावर रॅशेस पडू लागतात

आम्ही तुम्हाला सांगतो की, जुने अंडरगारमेंट्स सैल होतात तेव्हा त्यांच्यामध्ये ओलावा येतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया संसर्ग निर्माण करू लागतात. त्याच वेळी, खराब अंडरगारमेंट्स परिधान केल्याने शरीरावर पुरळ उठतात आणि खाजगी भागांमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो.