Hari Fall : टक्कल पडण्याची भीती वाटतेय? मग घरी बनवलेले हे हेअर मास्क नक्की वापरुन पाहा

जास्त केस गळणे आणि रोज गळणे ही एक मोठी समस्या आहे. पण काही घरगुती उपाय करूनही ही समस्या कमी करता येऊ शकते. केस गळती टाळण्यासाठी...

Updated: Sep 3, 2022, 11:15 AM IST
Hari Fall :  टक्कल पडण्याची भीती वाटतेय? मग घरी बनवलेले हे हेअर मास्क नक्की वापरुन पाहा  title=

Fenugreek Mask For Hair Fall : आजकाल केस गळण्याची समस्या सर्व वयोगटातील लोकांना सतावत असते. केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे पण जास्त केस गळणे आणि रोज गळणे ही एक मोठी समस्या आहे. पण काही घरगुती उपाय करूनही ही समस्या कमी करता येऊ शकते. केस गळती टाळण्यासाठी अनेकजण बाजारात उपलब्ध केमिकलयुक्त उत्तम केसांच्या उत्पादनांचा वापर करतात.

परंतु यामुळे फायद्याऐवजी तोटे होतात. अशा परिस्थितीत केसगळतीमुळे त्रासलेल्या लोकांनी काय करावे? जाणून घ्या...

मेथीच्या दाण्यांपासून केसांना होतो फायदा

मेथीमध्ये व्हिटॅमिन सी, प्रोटीन आणि लोह असते. ज्यामुळे टाळू मजबूत होतो. आठवड्यातून 2 दिवस हा हेअर मास्क लावल्यास केस गळण्याच्या समस्येवर मात करता येते. त्याची खास गोष्ट म्हणजे हे हेअर मास्क आपल्याला कोंडा आणि पांढर्‍या केसांपासूनही वाचवतात. तुमचे केस मजबूत, चमकदार आणि सुंदर होतात.

केसांचा मास्क कसा तयार करायचा?

हा हेअर मास्क तयार करण्यासाठी तुम्हाला 2 चमचे मेथीचे दाणे आणि 2 अंडी लागतील. मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी बारीक करून पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यात २ अंडी मिसळा मग मेथीचे दाणे हेअर मास्क तयार होईल.

मेथी दाना हेअर मास्क कसा लावावा

मेथी दाना हेअर मास्कचा पुरेपूर फायदा तुम्हाला तो योग्य प्रकारे कसा लावायचा हे माहीत असणे गरजेचे आहे. यासाठी सर्वप्रथम केस पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्या. नंतर हेअर मास्क टाळूवर लावा आणि सुमारे 30 मिनिटे सोडा. शेवटी स्वच्छ पाण्याने केस धुवा. काही दिवस ही प्रक्रिया पुन्हा केल्यास तुमचे केस मजबूत होतील आणि केसगळतीपासून सुटका मिळेल.

 

 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)