Health News : आपल्या संपूर्ण आहारामध्ये नाष्टा हा सर्वात महत्त्वाचा आहे. आपण सकाळी नाष्ट्यामध्ये काय खातो यावर दिवसाचं पचनतंत्रही अवलंबून असतं. नाष्ट्यामधून तुमच्या शरीराला दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते. यामुळेच तज्ज्ञांचा सल्ला आहे की नाष्टा कधीही टाळू नये. सकाळचा नाष्टा हा फक्त पोट भरण्यासाठी नसतो त्यातून मोठ्या प्रमाणात फायदा होतो. परंतू सकाळी नाष्ट्यामध्ये कोणते पदार्थ खाऊ नयेत?, याबाबत जाणून घेऊ.
व्हाइट ब्रेड
चहा किंवा कॉफीसोबत व्हाईट ब्रेड टोस्ट हा नाष्ट्यासाठी प्रत्येकाचा आवडता असतो, पण आरोग्यासाठी योग्य नाही. व्हाइट ब्रेडमध्ये कमी पोषक तत्त्व असतात. जेव्हा आपण व्हाइट ब्रेडवर जाम किंवा चॉकलेट सॉस लावतो तेव्हा ते पचनासाठी अडचणीचं ठरतं. त्यामुळे पांढऱ्या ब्रेडऐवजी लो फॅट बटर किंवा मल्टीग्रेन ब्रेड चीजसोबत घ्या.
पॅकबंद फळज्यूस
डॉक्टर नेहमी आपल्याला फळांचे ज्यूस घेण्याचा सल्ला देतात मात्र पॅकबंद ज्सूस हा आपल्याला वाटतात तितके निरोगी नाहीत. पॅकबंद ज्यूसमध्ये रस हा कमी प्रमाणात असतो आणि त्यामध्ये साखर टाकून गोड केले जातात. मात्र याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. यामध्ये लठ्ठपणा, मधुमेह, तसेच इतर अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो.
फ्लेवर्ड दही
तुम्ही त्या लोकांपैकी एक आहात जे नाष्ट्यामध्ये दही खातात?, फ्लेवर्ड योगर्टमध्ये साखर आणि गोड पदार्थ असतात, जे काही वेळा नेहमीच्या सॉफ्ट ड्रिंकच्या बाटलीमध्ये मिळणाऱ्या प्रमाणापेक्षा जास्त असू शकतात. त्यामुळे सकाळी सकाळी फ्लेवर्ड दह्याचं सेवन करणं टाळावं.
तळलेले अन्न
आपल्या सर्वांना माहित आहे की तळलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. परंतु जर आपण आपल्या सकाळची सुरुवात त्यापासून केली तर ते आणखी धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत, पकोडे, छोले भटुरे यांसारख्या डीप फ्राय गोष्टी सकाळी टाळाव्यात.