मुंबई : मान्सुनचे आमगन झाले आहे. त्यामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे. या आल्हाददायी वातावरणाचा आनंद लुटत असताना त्वचा, केस, आरोग्य यांची काळजी घेणेही महत्त्वाचे ठरते. उन्हात घामामुळे भिजणारे केस, मान्सुनमध्ये पावसामुळे भिजतात. त्यामुळे केसांना उग्र वास येऊ लागतो. सतत भिजलेल्या केसांमुळे इंफेक्शन होण्याची शक्यता असते. कोंड्यासारखी समस्या उद्भवू शकते. म्हणून केसांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी काही खास टिप्स...
- घरातून निघताना ओले केस पूर्णपणे सुकवा. केस खराब होण्यापासून वाचवण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
- केसांना डीप कंडीशनिंगची आवश्यकता असते. त्यामुळे तेलाने मालिश केल्यानंतरच केस शॅम्पू, कंडीशनरने धुवा.
- नियमित केस धुतल्याने केस स्वच्छ राहतात. त्यामुळे इनफेक्शनपासून बचाव होतो.
- ओले केस कधीही बांधू नका किंवा फणीने विंचरु नका. त्यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक असते.