'हे' ड्रायफ्रुट्स खा भिजवून, त्त्वचेला येईल चमक अन् होतील आरोग्यदायी फायदे

ड्रायफ्रुट्स भिजवून खात नसाल तर ही बातमी जरूर वाचा!

Updated: Oct 6, 2022, 08:33 PM IST
'हे' ड्रायफ्रुट्स खा भिजवून, त्त्वचेला येईल चमक अन् होतील आरोग्यदायी फायदे title=

Soaked Dry Fruits Benefits : निरोगी राहण्यासाठी बहुतेक लोक ड्राय फ्रुट्स खातात. तसेच सकाळी नाष्टा म्हणूनही अनेकजण ड्राय फ्रुट्स खातात. इतकंच नाही तर ड्राय फ्रुट्सचा रोजच्या आहारामध्ये समावेश केल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जाही वाढते. काही लोक कच्चे ड्राय फ्रुट्स खातात, तर काही लोक भिजवून खातात. तर नक्की कोणते ड्राय फ्रूट्स भिजवून खावेत जाणून घ्या. (health tips do not consume these dry fruits without soaking Marathi Health News)

मनुका
भिजवलेले मनुके खाल्ल्याने पोटाच्या समस्यांवरही मात करता येते. सकाळी सर्वात आधी पाण्यात भिजवलेले मनुके खाल्ल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अॅसिडिटीपासूनही मुक्ती मिळते.

अंजीर
अंजीर हे अतिशय चविष्ट ड्रायफ्रुट्सपैकी एक आहे. त्यामध्ये फक्त फायबरच नाही तर फॅट, कोलेस्टेरॉलही असते. पण अंजीर नेहमी भिजवून खावं कारण अंजीर भिजवून खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

खजूर
खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात लोह आणि जीवनसत्त्वे असतात. खजूरामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण देखील जास्त असतं. त्यामुळे शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत राहतो. त्यासोबतच भिजवलेल्या खजूरांनी तुमचं हृदयही निरोगी राहण्यास मदत होते.

बदाम
अनेकजण बदाम तसेच खातात मात्र तुम्ही तेच बदाम भिजवून खाल्ले तर त्यातील व्हिटॅमिन-ई आणि अँटीऑक्सिडंट शरीराला मिळतात. भिजवलेल्या बदामांनी तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी बनते. त्यामुळे तुम्ही फक्त भिजवलेले बदाम खावेत.