मुंबई : आपल्यापैकी अनेकांना वाढत्या वजनामुळे हैराण केले असेल. त्यामुळे वाढत्या वजनावर कंट्रोल मिळविण्यासाठी ही मंडळी अनेक क्लृप्त्या वापरत असतात. मग, त्यात उपवास करण्यापासून ते खाल्लेले अन्न घशात बोट अडकवून उलट्या करण्यापर्यंत. पण, आम्ही तुम्हाला असा काही अहार सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे वाढते वजन नियंत्रणात राहण्यासाठी नक्की मदद होईल.
सफरचंद आणि पीनट बटरचे सेवन - हा अहार घ्याल तर, तुमच्या शरीरातील उर्जाही कायम राहिल आणि तुमच्या शरीराच्या वाढत्या वजनावरही नियंत्रण राखले जाईल. त्यासाठी दिवसभरात ५० ग्रॅम सफरचंद कापन त्यावर पीनट बटर लाऊ खा. वजनाला फरक पडतो.
फळांचे सेवन करा : वाढत्या वजनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्या आहारात कमी कॅलरी असलेल्या फळांचा वापर करा. उदा. अननस, द्राक्षे, कीवी आदी. ही फळे आपल्या शरीरातील अतिरिक्त वाढणाऱ्या चरबीवर मर्यादा घालतील. तसेच, शरीराला आवश्यक ते घटकही या फळांतून मिळतील.
गाजर आणि मेयोनीज : हा सुद्धा वाढत्या वजनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रभावी उपाय आहे. गाजराचे तुकडे आणि मेयोनीजचा वापर करा. हा सुद्धा शरीरातील फॅट्स कमी करणारा अहार आहे.
फळ आणि दही : फळं आणि दही यांचे एकत्र सेवन हासुद्धा फायदेशीर उपाय आहे. या अहारामुळेसुद्धा तुमच्या शरीरातील वाढत्या फॅट्स कमी होऊ शकतात. तसेच, वजनवाढीला आळा घालता येऊ शकतो.