पोट साफ होत नाही? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' उपाय

आजकाल धावपळीची जीवनशैली आणि पोषक आहाराचा अभाव आणि पुरेशी झोप न मिळाल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. 

Updated: May 8, 2018, 09:12 PM IST
पोट साफ होत नाही? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' उपाय  title=

 मुंबई : आजकाल धावपळीची जीवनशैली आणि पोषक आहाराचा अभाव आणि पुरेशी झोप न मिळाल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. अशापैकी एक म्हणजे बद्धकोष्ठता. सकाळी उठल्यावर पोट साफ होत नसल्याने अनेकांची दिवसभर चिडचिड होते. अशावेळेस पोट साफ करण्यासाठी तुम्हांला औषध गोळ्या किंवा कडवट चूर्णांची गरज नाही तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवू शकता.  

 रात्री झोपण्यापूर्वी करा हे घरगुती उपाय -   

 त्रिफळा चूर्ण मातीच्या भांड्यात भिजवत ठेवा. त्याचं पाणी गाळून प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते.  
 
 भिजवलेली अळशी चाऊन खावी. सोबतच अळशीचं पाणीदेखील प्यायल्याने फायदा होतो.  
 
 काही मनुका पाण्यात भिजवा. भिजवलेल्या मनुक्याचं पाणी पिणं आणि सोबतच मनुका खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. 
 
 दूधात 2-3 अंजीर उकळा. कोमट दूध आणि अंजीर खाल्ल्यानेही बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. 
 
 ग्लासभर दूधामध्ये एक चमचा एरंडेल तेल मिसळून प्यावे. 
 
 ग्लासभर कोमट पाण्यात 2 चमचे कोरफ़डीचा गर  मिसळून प्या. 

 
 रात्री या चूका करणं टाळा -  

 रात्रीच्या जेवणात मैदा, जंकफूडचा समावेश करणं टाळा. यामध्ये फायबर घटक नसल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. 
 
 रात्री दारूचे सेवन, सिगारेट प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. 
 
 आयर्न, कॅल्शियम सप्लिमेंट यांचे रात्री सेवन करणं टाळा. 
 
 रात्रीच्या वेळेस डेअरी प्रोडक्ट्स टाळा. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक गंभीर होतो. 
 
 रात्रीच्या वेळेस चहा, कॉफी पिणं टाळा.