मुंबई : सुडौल शरीर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन वाढत आहे आणि वाढते वजनचं अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. पण वाढलेले वजन कमी करणे मोठे आव्हान ठरत आहे. स्थुलता, पोटावरील अतिरीक्त चरबी ही अनेक मुलींची समस्या आहे. त्यामुळे सुंदर दिसण्याची समस्याही भंग पावते. इतकंच नाही तर आरोग्याचा समस्याही उद्भवतात.
स्थुलता, वाढलेले पोट ही आजच्या तरुणाईची समस्या आहे. त्यासाठी अनेकजण जीम लावतात, व्यायाम करतात, महागडे प्रोडक्ट्स वापरतात. पण अनेकदा त्यांना वजन कमी करण्यात यश येत नाही. किंवा त्यात सातत्य राखणे अनेकांना जमत नाही. पण पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल...