फळं खाताना ही चूक करु नका, याचा शरीराला फायद्या ऐवजी नुकसानच जास्त होईल

फळांमध्ये यीस्ट असते, ज्यामुळे पोटात आम्ल तयार होते.

Updated: Dec 10, 2021, 03:01 PM IST
फळं खाताना ही चूक करु नका, याचा शरीराला फायद्या ऐवजी नुकसानच जास्त होईल title=

मुंबई : आपल्यापैकी बरेच जण जेवणासोबत फळे खातात. विशेषत: बहुतेक लोक जेवणासोबत आंबा खातात. याशिवाय काही लोक जेवण्यापूर्वी किंवा जेवणानंतर फळे खातात. बर्‍याच वेळा आपण कोणत्याही फंक्शनला गेलो की आधी फ्रूटचॅट खातो, मग जेवण जेवतो. पण तुम्हाला हे माहित आहे का? की फळे खाण्याच्या या सर्व पद्धती चुकीच्या आहेत आणि इतक्या वर्षापासून आपण या चुकीच्या पद्धतींचा अवलंब करत आहेत.

वास्तविक फळाला संपूर्ण अन्न मानले जाते. जेंव्हा तुम्ही ते खात आहात तेव्हा फक्त फळच खा. त्यामुळे फळे खाल्ल्यानंतर ४५ मिनिटे आधी आणि ४५ मिनिटांनंतर काहीही खाऊ नये. तसेच फळे खाल्यानंतर पाणीही पिऊ नका. असे केल्याने फळ काही वेळातच पचते आणि त्याचे सर्व फायदेही शरीराला मिळत नाहीत.

याचे कारण म्हणजे फळांमध्ये 80 ते 90 टक्के पाणी असते. त्यामुळे अतिरिक्त पाण्याची गरज भासत नाही. याशिवाय फळांमध्ये यीस्ट असते, ज्यामुळे पोटात आम्ल तयार होते. पाणी प्यायल्याने पोटात अॅसिडचे प्रमाण वाढते, अशा स्थितीत पचनाशी संबंधित समस्या सुरू होतात.

अशा स्थितीत तुम्हाला उलट्या किंवा जुलाबाची समस्या होऊ शकते. त्यामुळे जेवल्यानंतर किंवा काहीही खाल्यानंतर अर्धा तास तरी काहीही न खाण्याचा डॉक्टर देखील सल्ला देतात.

तसचे जर तुम्ही कोणतेही फळ जेवणासोबत खाल्ल्यास यामुळे तुम्हाला गॅस, अॅसिडीटी, अपचन, पोटात जडपणाचा त्रास होतो. याचे कारण म्हणजे फळाची स्वतःची नैसर्गिक साखर असते. साखर कोणत्याही गोष्टीत किण्वन सुरू करते. अशा स्थितीत खाल्लेले अन्न सडू लागते.