मुंबई : शरीरासाठी हळद घातलेलं दूध पिणं (Haldi Doodh Benefits)अतिशय फायदेशीर मानलं जातं. डॉक्टरांकडूनही हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हळदीच्या दुधाचे इम्युनिटी वाढण्यासह, एन्टी-बायोटिक (Antibiotic), एन्टी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory) आणि एन्टी-ऑक्सिडेंट (Antioxidant)गुणधर्मांसह आरोग्याला अनेक फायदे आहेत. आयुर्वेदानुसार, हळदीचं दूध 'सुपर ड्रिंक'च्या म्हणूनही ओळखलं जातं. गरम दुधामध्ये हळद मिसळून पियाल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये आराम मिळतो, पण दोन परिस्थितीत हळदीच्या दूधाचं सेवन करु नये.
कफ बाहेर पडत नसल्यास -
- कप Cough साठून राहत असल्याची समस्या असल्यास किंवा कफ बाहेर पडत नसल्यास हळदीचं दूध पिऊ नये.
- कफ बाहेर पडत नसल्यास, त्यात हळदीचं दूध पियाल्यास कफ आतचं राहतो. त्यामुळे छातीत जणपणा जाणवू शकतो.
श्वास घेण्यास त्रास -
- श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा श्वास घेताना छातीत दुखत असल्यास अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध पिऊ नये.
- हळदीमध्ये असणारे गुण इतके तिखट असतात, की ते आपल्या श्वसन संस्थेला अतिसक्रिय करतात. त्यामुळे श्वास घेण्याची समस्या उद्भवू शकते.
- श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या असल्यास किंवा पंप वापरत असल्यास चुकूनही रात्री हळदीचं दूध पिऊ नये.