मुंबई : पपईची झाडे इतकी फायदेशीर आहेत की त्याची पाने, मुळे, देठ आणि बिया वापरून शरीराच्या अनेक रोगांसाठी याचा वापर करता येतो. पोटात किंवा यकृतामध्ये आतड्याची समस्या असो, पपईचे नियमित सेवन केल्यास पोटाच्या गंभीर समस्यांपासून सुटका मिळू शकते. अशा परिस्थितीत, पपईमुळे असे नक्की काय होते? पपईचा वापर शरीराच्या कोणत्या समस्यांसाठी केला जाऊ शकतो हे देखील माहित करुन घ्या.
पपईमध्ये फायबर, कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, ई, ए आणि इतर अनेक मिनरल्स असतात जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्वाचे असतात. पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते, तसेच व्हिटॅमिन ए देखील पुरेशा प्रमाणात असते. जे दृष्टी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
पपईचे महत्त्व लोकांना तेव्हापासून कळले जेव्हा दक्षिण आफ्रिकेतील लोकांनी अल्सर आणि जखमांवर उपचार करण्यासाठी पपईचा लगदा करुन वापरला. असे केल्याने जखमा बऱ्या झाल्या. म्हणूनच पपईला सुवर्णवृक्षाचे सोनेरी फळ म्हटले जाते. तसेच याला निसर्गाची अनमोल देणगी मानले जाते.
पपईमध्ये पपेन नावाचा पदार्थ असतो, जो पोटातील मांस पचवण्यासाठी खूप प्रभावी असतो. जड आहार सहज पचवण्याची क्षमता पपईची खासियत आहे, जी त्याला इतर फळांपेक्षा वेगळा दर्जा देते. पपईच्या बिया औषधासाठी वापरल्या जातात. पपईच्या फळांच्या सॅलडचे अनेक प्रकार केला जातात. तर त्याता एक तुकडा जरी आपण खाल्ला तरी ते आपले दात आणि हाडांच्या आजारांसाठी खूप फायदेशीर मानले जातो.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए, लोह आणि व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि पोटॅशियम आहे. हे पपईला विशेष फळ बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते. याशिवाय पपईचा लगदा चेहऱ्यावर लावल्यास चेहरा चमकू लागतो. यासह, पचन सुधारण्यासाठी पोटाचे आजार बरे करण्यासाठी पपई खूपच चांगला असल्याचे मानले जाते.
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी रोग होतो. असे म्हटले जाते की, प्रसिद्ध पर्यटक मार्को पोलो आणि त्याच्या साथीदारांना दात आणि हाडे स्कर्वीचा आजार होता. त्याच्या दातांमधून रक्तस्त्राव थांबत नव्हता आणि हाडांमधील समस्या वाढल्या होत्या, नंतर पपईच्या मदतीने सर्व साथीदार निरोगी झाले. साहजिकच स्कर्वी रोगापासून मुक्त होण्यासाठी पपईची भूमिका महत्त्वाची होती.
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे दातांची समस्या उद्भवते आणि पपईमध्ये व्हिटॅमिन सीचे जास्त प्रमाण फायदेशीर मानले जाते.
पोटात जडपणा आल्यास पपईचा वापर फायदेशीर ठरतो. पपईमध्ये अशी खासियत आहे की, ती व्यक्तीमध्ये अद्वितीय शक्ती निर्माण करू शकते आणि त्याचे जीवन वाढवते. म्हणूनच त्याला जीवनाचे फळ आणि सोनेरी झाडाचे सोनेरी फळ असेही म्हणतात. मुलांच्या आहारात पपईचा समावेश करणे त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक मानले जाते.
असे म्हटले जाते की, जेव्हा कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला, तेव्हा तेथील लोकांना पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले. तिथले लोक जेवणात मांस आणि मासे भरपूर खाताना त्याला आढळले, पण त्यांना कोणत्याही प्रकारची पोटात अस्वस्थता किंवा जडपणा जाणवला नाही. तेथे प्रत्यक्षात अन्नाबरोबर पपई खाण्याची प्रथा होती, त्यामुळे तेथील लोकांची पचनशक्ती खूप मजबूत होती.