मुंबई : थंडीच्या दिवसांत ओठ फुटणे, हातपाय कोरडे पडणे या समस्या सतावतात. फुटलेल्या ओठांसाठी बाजारात अनेक उत्पादने आहेत. मात्र त्यामुळे ओठ मुलायम राहतीलच असे नाही. आता तुम्हाला बाजारातून लिपबाम खरेदी करण्याची गरज पडणार नाही. घरच्या घरी तुम्ही लिपबाम बनवू शकता.
मायक्रोवेव्ह बाऊलमध्ये पेट्रोलियम जेली टाका. हा बाऊल मायक्रोवेव्ह अथवा हीटप्रूफ बाऊल गरम पाण्यात ठेवून वितळवा. पेट्रोलियम जेलीमध्ये रंग मिसळण्यासाठी आवडत्या लिपस्टिकचा तुकडा टाका आणि नीट मिसळा. चमच्याच्या सहाय्याने मिश्रण एकजीव करा.
नैसर्गिक रंगासाठी तुम्ही यात थोडासा ज्यूस अथवा अर्कही मिसळू शकता. हे मिश्रण थंड होऊ द्या. त्यानंतर बाम कंटेनरमध्ये हे मिश्रण ओतून वापर करा.