Monkeypox Virus : कोरोनाचा धोका टळलाय असं वाटत असतानाच देशात आता मंकीपॉक्सची दहशत पसरलीय. भारतात मंकीपॉक्सचे 4 रूग्ण आढळून आले आहेत. तर तेलंगणात आढळलेल्या रूग्णाला तातडीनं हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय.
मंकीपॉक्स आतापर्यंत 75 देशांमध्ये फैलावलाय. जगभरात 16 हजार रूग्णांना मंकीपॉक्सची लागण झाली असून 5 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे WHOनं जागतिक आणीबाणी घोषित केलीय. भारतातही मंकीपॉक्सचे रूग्ण आढळल्यानं आरोग्ययंत्रणा अलर्ट झालीय.
मंकीपॉक्सची लक्षणं काय?
- कांजण्यांसारखाच मंकीपॉक्सचा आजार
- ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, पाठदुखी, हुडहुडी, थकवा
- 101 ते 103 फॅरेनाईड ताप
- रुग्णाच्या अंगावर मोठमोठे व्रण, फोड
- चेहऱ्यावरून फोड आल्यानंतर शरीरभर पसरतात
मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेऊन काळजी घेणंही आवश्यक आहे.
काय काळजी घ्याल
विदेशातून आलेल्या लोकांच्या संपर्कात येऊ नका. माकड, उंदीर तसच मृत जनावरांपासूनपासून दूर राहा. आजारी रूग्णांचं अंथरूण, कपडे वापरू नका. रोगाची लक्षणं दिसल्यास तत्काळ तज्ज्ञ डॉक्टारांचा सल्ला घ्या.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रभावी उपाययोजना केल्यास मंकीपॉक्सला दूर ठेवणं शक्य आहे. विलगीकरणाच्या माध्यमातून या रोगाला बराच आळा घालता येऊ शकतो. त्यामुळे मंकीपॉक्सला हलक्यात घेऊ नका, सतर्क राहा.