पावसाळ्यात 'या' गोष्टींची सर्वात जास्त भीती... काळजी घ्या, नाही तर गाठावे लागेल हॉस्पिटल

पावसाळ्यात जर काही गोष्टींकडे लक्ष दिले नाही, तर त्याचे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात. 

Updated: Jul 11, 2022, 01:51 PM IST
पावसाळ्यात 'या' गोष्टींची सर्वात जास्त भीती...  काळजी घ्या, नाही तर गाठावे लागेल हॉस्पिटल title=

मुंबई : पावसाळ्या सुरु झाला की, वातावरण एकदम अल्हाददायक होऊन जातं. नयनरम्य निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोकं अनेक ठिकाणी पावसाळी पिकनिक करण्यासाठी जातात. बाहेर पाऊस पडायला लागला की, सगळ्यात पहिले आपण गरमा गरम भजीचा स्वाद घेतो. मात्र पावसाळा जेवढा आनंद देणारा ऋतू आहे तेवढाच त्रासदायक सुद्धा आहे. पावसाळ्यात जर काही गोष्टींकडे लक्ष दिले नाही, तर त्याचे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे पावसाळ्यात या चुका टाळा आणि हॉस्पिटलच्या पाया चढण्यापासून दूर राहा.

पावसाळ्यात कसली भीती?

पावसाळ्यात सगळ्यात जास्त रोगराई परसरण्याची भीती असते. पावसाळ्यातील दिवसांमध्ये इंफेक्शन होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात आपली पचनक्रिया कमजोर असते. त्यामुळे या दिवसात एलर्जीचीही भीती असते. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि आपल्या प्रकृतीची काळजी घ्या.

पावसाळ्यात 'या' चुका करु नका

1. पावसाळ्यात पचनास जड असे अन्नपदार्थ टाळा.
2. तेलकट आणि तळलेले अन्नपदार्थ खाऊ नका. कारण या पदार्थांमुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या होते.
3. पाणीपुरी, चाट इत्यादी सारखे रस्त्यावरील दुकानांतील अन्नपदार्थ खाणे टाळा.
4. पावसाळ्यात बाहेरील पाणी टाळा. घरातलं उकळलेलं पाणी प्या. कारण पाण्यामुळे इंफेक्शन होण्याची भीती असते.
5. डेयरी प्रॉडक्ट्सचे सेवन शक्य तेवढं टाळा. कारण डेयरी प्रॉडक्ट्स हे पावसाळ्यात पचनासाठी जड असतात.
6. हिरव्या भाजीपाला हा आरोग्यासाठी पोषक असतात. मात्र पावसाळ्यात हिरव्या भाजीपाल्यांवर किड लागते. त्यामुळे पावसाळ्यात हिरवा भाजीपाला घेताना विशेष लक्ष द्या.

हे नक्की घ्या

पावसाळ्यात इंफेक्शनची भीती असल्यामुळे तुमच्या आहात या गोष्टींचा नक्की समावेश करा. कॅमोमाइल, ग्रीन टी, आलं, लिंबूचा चहा आणि हर्बलयुक्त पदार्थांचं सेवन करा.