Mosquito bite : दरवर्षी जगभरात लाखो लोक डासांमुळे पसरणाऱ्या कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त असतात. मलेरिया हा डास (mosquito) चावल्यामुळे होणारा सर्वात सामान्य आणि धोकादायक रोग आहे. दरवर्षी मलेरियामुळे सुमारे 4 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (mosquito bite reason why mosquito bite gives dengue and malaria)
वाढत्या जागरुकतेमुळे, रुग्णांची संख्या आणि मृत्यूची संख्या या दोन्हीमध्ये घट झाली आहे. जेव्हा एखादा संक्रमित डास निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा त्या व्यक्तीला मलेरियाची (Malaria) लागण होऊ शकते.
अनेक जण असं सांगताना तुम्ही ऐकलं असेल, की डास त्यांनाच जास्त चावतात. हफ पोस्टने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार डास हे सिलेक्टिव्ह इन्सेक्ट्स (Selective Insects) आहेत. म्हणजेच कोणाला चावायचं याची निवड ते करतात आणि त्यामुळे काही ठरावीक व्यक्तींना इतरांच्या तुलनेत डास जास्त वेळा चावत असल्याचा अनुभव येतो.
जेव्हा डास तुम्हाला चावतात आणि रक्त पितात तेव्हा तुमची चिडचिड होतेच. पण त्यामागील कारण तुम्हाला माहीत आहे का? घरात किंवा ऑफिसमध्ये कुठेही बसल्यावर अचानक डास तुमचे हात, पाय, मान, तोंड आणि शरीराच्या अवयवांना चावतात आणि तुम्हाला खाज सुटू लागते. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला सांगतो की या डासांचे असे करण्यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे.
आम्ही तुम्हाला डासांशी संबंधित एक रंजक गोष्ट सांगतो की, एक डास स्वतःच्या वजनाच्या तिप्पट माणसांचे रक्त शोषू शकतो. त्याच वेळी, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डासांना मानवी रक्त शोषून ऊर्जा मिळते. यामुळेच ते वारंवार माणसांना चावतात आणि त्यांचे रक्त चोखतात. डास तुम्हाला चावल्याने मानवी रक्तातील पोषक तत्त्वे मिळवतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फक्त मादी डासच माणसांना चावतात. जेव्हा ती आपल्या मुलांना जन्म देणार असते तेव्हा ती असे करते.
वास्तविक, डास हे बॅक्टेरिया (Bacteria) आणि घामाचा वास आकर्षित करतात. त्यामुळे ते माणसांचे बहुतेकदा पायांना चावत असते. कारण आपल्या पायावर धूळ आणि घाण बसते. त्यात काही बॅक्टेरियाही असू शकतात. त्यामुळे डास पायाला जास्त चावतात. त्याचबरोबर रोगाचा प्रसार करणाऱ्या डासांना फारसे उडता येत नाही. त्यामुळेच पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियापासून (Dengue and Malaria) बचाव करण्यासाठी डॉक्टरही प्रत्येकाने पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि पूर्ण पँट, म्हणजे शरीर पूर्णपणे झाकले जाणारे कपडे घालण्याचा सल्ला देतात.
वाचा : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ! 1 लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजाल? जाणून घ्या
तसेच डासांची दृष्टीही चांगली असते. आजूबाजूच्या वातावरणात ठळकपणे काय उठून दिसतं आहे, हे त्यांना कळतं. त्यामुळे डार्क रंगाचे कपडे घातले असतील, तर अशा व्यक्तीकडे डास जास्त आकर्षित होतात,' असंही डे यांनी सांगितलं.
शरीराचं तापमान हाही महत्त्वाचा घटक असतो. प्रत्येकाच्या शरीराचं तापमान वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतं; पण त्यातल्या त्यात अधिक उष्ण तापमान असलेल्या व्यक्तींच्या शरीरावर डास बसण्याची शक्यता जास्त असते. त्वचेच्या जवळ रक्त मिळेल, अशा ठिकाणी डास बसतात.