पोटात वाढणार्‍या कृमींचा त्रास कमी करण्यासाठी '3' घरगुती उपाय

पोटात कृमींची वाढ झाल्यास अनेक त्रासदायक समस्या वाढीस लागतात.

Updated: Mar 1, 2018, 08:21 PM IST
पोटात वाढणार्‍या कृमींचा त्रास कमी करण्यासाठी '3' घरगुती उपाय  title=

मुंबई : पोटात कृमींची वाढ झाल्यास अनेक त्रासदायक समस्या वाढीस लागतात.

सुरूवातीच्या टप्प्यात अनेकजण ही समस्या लहान असल्याने त्याकडे दुर्लक्ष करतात परंतू वेळीच ओषधोपचार न केल्यास हा त्रास दिवसेंदिवस अधिक गंभीर होण्याची शक्यता असते.  

पोटात कृमींची वाढ होतेय असे निदर्शनास आल्यास सुरूवातीच्या टप्प्यात काही घरगुती उपायांनी त्यावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे. याकरिता कच्ची सुपारी फायदेशीर ठरते. 

पहा कसा कराल कच्च्या सुपारीचा वापर ? 

कच्ची सुपारी दूधासोबत उगाळा. हे मिश्रण खाल्ल्यास पोटातील किडे कमी होण्यास मदत होते. 

पपईच्या बीया 

पोटातील किड्यांचा त्रास कमी करण्यासाठी पपईच्या बीयादेखील फायदेशीर ठरतात. एक ते दोन चमचे पपईच्या बीया खाल्ल्यास पोटातील कृमींचा त्रास कमी होतो.  

कडूलिंब  

कडूलिंबामध्ये बॅक्टेरियांचा नाश करण्याची क्षमता असते. कडूलिंबाचा पाला किंवा कडूलिंबाचे तेल आहारात घेतल्यास त्याच्यामुळेही पोटातील कृमींचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. 

घरगुती किंवा नैसर्गिक उपाय हे प्रत्येकावर हमखास परिणामकारक ठरतीलच असे नाही. त्यामुळे तुम्हांला होणार्‍या त्रासाची तीव्रता पाहून औषधोपचार ठरवा. घरगुती उपायासोबतच वैद्यकीय सल्लादेखील अवश्य घ्यावा.