मुंबई : मुली जेव्हा सौंदर्याचा विचार करतात तेव्हा तो केवळ त्वचा, केस इतपर्यंत मर्यादीत नसतो. अनेक मुली त्यांच्या नखांचीदेखील विशेष काळजी घेतात. घरकाम करणार्यांमध्ये नखं वाढवणं आणि जपणं कठीण आहे. त्यामुळे अनेकजणी आर्टिफिशिअल नखांचा वापर करतात.
ज्या मुलींची नखं झटपट वाढत नाहीत किंवा ढिसुळ नखांमुळे ती वारंवार तुटतात. अशांसाठी नखांची वाढ सुधारण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायदेशीर आहे.
नखांना वाढवण्यासाठी लसूण फायदेशीर आहेत. 3-4 लसणाच्या कळ्या गरम पाण्यामध्ये मिसळून 15 मिनिटं उकळा. त्यानंतर लसणाच्या कळ्यांची पेस्ट करा. लसणाची पेस्ट, व्हिटॅमिन ई ची कॅप्सुल आणि लिंबाचा रस एकत्र करून नखांवर लावा. नखांवर पेस्ट सुकल्यानंतर साध्या पाण्याने नखं स्वच्छ करा.