मुंबई : आयुषमान खुरानाच्या विकी डोनर या सिनेमानंतर भारतात स्पर्म डोनेशनच्या प्रक्रियेला मेनस्ट्रीम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर आता चीनच्या एका स्पर्म बँकने सर्वोत्तम स्पर्म शोध घेण्यासाठी एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ज्यानंतर विजेत्याला या बँकेत डोनर बनण्याची संधी मिळणार आहे.
शंघाईच्या ह्युमन स्पर्म बँकने आपल्या एका स्पर्धेच्या माध्यमातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्पर्म डोनेशन स्पर्धैसाठी बोलवण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम सीमन असलेल्या व्यक्तीला विजेता घोषित केलं जाणार आहे. स्पर्म बँकचं म्हणणं आहे की, ते या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सेक्श्युअल हेल्थचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या स्पर्म बँकेने सोशल मीडियावर एक जाहिरात दिली होती. हा कॉन्टेस्ट 12 जुलैपासून लाँच करण्यात आला आहे. ज्या व्यक्तीचा स्पर्म काऊंट सर्वाधिक असेल त्याला विजेता घोषित केलं जाईल. दरम्यान बँकेने हे स्पष्ट केलं आहे की, विजेत्यांची नावं ते सार्वजनिकरित्या जाहीर करणार नाहीत.
ही स्पर्म बँक दर महिन्याला एक यादी जाहीर करते. ज्यामध्ये बेस्ट स्पर्मच्या बाबतीत पोस्ट केलं जातं. ही स्पर्धा जिंकल्यानंतर संबंधित स्पर्म डोनरला काही अटी लागू केल्या जातील. यासाठी त्या व्यक्तीचा स्पर्म काऊंट 60 मिलियन स्पर्म प्रति मिलीलीटर सीमन असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची उंची 165 सेंटीमीटरपेक्षा अधिक असायला पाहिजे.
गेल्या काही वर्षांमध्ये, जागतिक स्तरावर पुरुषांमध्ये स्पर्म काऊंटची कमतरता पहायला मिळतेय. चीनच्या स्पर्म बँकांमध्ये स्पर्म क्वालिटीमध्ये घट झाली आहे. यामुळे, स्पर्म डोनेशन संदर्भात लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा विविध मोहीम राबवण्यात येतायत.