मुंबई : अनेक लोकं दात किडण्याच्या समस्येपासून त्रस्त असतात. यामुळे दात किंवा दाढ दुखणे तसेच अती गरम किंवा अती थंड पदार्थ खायला न मिळणे अशा समस्या आहेत. अनेकदा दात स्वच्छ न केल्यामुळे ही समस्या उद्भवते, या पोकळ्या लवकरात लवकर दूर कराव्यात, नाहीतर बाकीचे दात खराब करू शकतात, खरे तर चॉकलेट किंवा गोड पदार्थ जास्त खाल्ल्याने दातांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे दातांची पोकळी निर्माण होते. परंतु यासाठी लोकांना काही विशेष उपचार मिळत नाहीत. लोकांना यासाठी दाताच्या डॉक्टरकडे जावे लागते. याच्याशिवाय लोकांना दुसरा घरगुती पर्याय माहित नसतो.
परंतु आम्ही तुम्हाला यावर काही घरगुती उपाय सुचवणार आहोत, जे तुम्हाला नक्कीच मदत करतील.
पोकळी किंवा किड लवकर दूर करण्यासाठी तुम्ही जेष्ठमध पावडर वापरू शकता, यासाठी तुम्ही जेष्ठमध खरेदी करू शकता किंवा घरच्या घरी जेष्ठमधच्या मुळापासून पावडर बनवू शकता. यापावडरने ब्रश करा आणि ते स्वच्छ धुवा. हे खूपच गुणकारी आहे.
गावातील लोक अनेकदा कडुलिंबाने दात घासतात, ज्यामुळे त्यांना दातांसंबंधी कोणतीही समस्या येत नाही. त्यामुळे पोकळी दूर करण्यासाठी आणि दातांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी कडुनिंबाने दात घासू शकता.
हर्बल पावडर घरीच सोप्या पद्धतीने बनवता येते, त्यासाठी तुम्हाला २ चमचे आवळा, एक टीस्पून कडुलिंब, अर्धा चमचा दालचिनी पावडर, बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा लवंग पावडर एकत्र करून मिक्स करावे लागेल. याचा वापर करुन तुम्हाला नीट दात घासावे लागेल, लवकरच तुमच्या दातातून पोकळी आणि रक्तस्रावाची समस्याही संपेल.
तुम्ही पाहिलेच असेल की, लोक श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करतात, खोबरेल तेलाने जर तुम्ही गुळण्या केल्यात तर प्लेक, बॅक्टेरिया आणि दात सडण्याच्या समस्या दूर होतील. हे पोकळी दूर करण्यासाठी सर्वात शक्तिशाली उपायांपैकी एक आहे.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)