मुंबई : कोरोना व्हायरसने लोकांचं जीवन पूर्णपणे बदलून टाकलं आहे. एकीकडे, मास्क आणि सॅनिटायझर्स सामान्य लोकांची दैनंदिन गरज बनली असताना, डॉक्टरांनी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना पीपीई किट घालणं आवश्यक बनलं आहे. मात्र या पीपीई किटमुळे रूग्णांना डॉक्टर हे डॉक्टर नव्हे तर भूत वाटू लागले आहेत. नुकतंच असा एक व्हिडीयो समोर आला असून पीपीई कीटमध्ये आलेल्या डॉक्टरला पाहून रूग्ण चक्क रडू लागली.
या व्हिडीयोमध्ये असं दिसलं की, जेव्हा डॉक्टर त्याच्या महिला पेशंटला भेटायला गेले, तेव्हा ती त्यांना पाहताच ओरडू लागली. इतकंच नव्हे तर भीतीमुळे बाजूला असलेल्या रुग्णालाही घाम सुटला आणि आपला आजार विसरून आजारी व्यक्ती त्याच्या पलंगावरुन उठून बसला.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डॉक्टर त्यांच्या वेळेत रुग्णांना भेटायला येतात. पण याचवेळी एक महिला रुग्ण त्यांना भूत समजून घाबरते आणि मोठ्याने ओरडू लागते. महिलेच्या किंचाळण्याचा आवाज बाजूच्या बेडवर पडलेला रुग्णंही घाबरतो. मात्र पीपीई कीटमध्ये डॉक्टर असल्याचं लक्षात येताच तो सुटकेचा नि:श्वास सोडतो.
हा मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जे पाहून लोक मजेदार कमेंट्स करतायत. यावेळी एका युजरने म्हटलंय की, 'पेशंटने पेशंस गमावले. तर दुसऱ्या युजरने लिहिलंय, 'असं दिसतंय की, त्या महिलेने डॉक्टरांना चक्क यमराज समजलं.