पिरीयड्समध्ये 'या' 5 गोष्टी वाढवतात तुमच्या वेदना

पीरियड्सच्या दिवसांमध्ये महिलांना तसंच मुलींना अनेक त्रास सहन करावे लागतात.

Updated: Aug 4, 2021, 08:27 PM IST
पिरीयड्समध्ये 'या' 5 गोष्टी वाढवतात तुमच्या वेदना title=

मुंबई : पीरियड्सच्या दिवसांमध्ये महिलांना तसंच मुलींना अनेक त्रास सहन करावे लागतात. अनेक महिलांना ओटीपोटात दुखण्याची तीव्र वेदना होण्याची समस्या जाणवते. अनेकदा वेदना या पाय तसंच कमरेतही होतात. सामान्यपणे गर्भाशयाच्या आकारात बदल झाल्याने आणि गर्भाशयात रक्ताचं कमी झाल्याने वेदना जाणवतात. 

मासिक पाळीच्या दरम्यान गर्भाशय आकुंचन पावण्याची समस्या सुरु होते त्यावेळी  प्रोस्टाग्लैंडीन हार्मोन रिलीज होतं. यामध्ये जर काही महिलांना फाइब्रॉयड्स, पेल्विक इंफ्लेमेटरी डिसिज किंवा एंडोमेट्रिओसिस यांची समस्या असेल तर अशा महिलांना पिरीयड्सच्या वेळी अधिक त्रास होतो. जर तुम्हाला देखील पिरीयड्च्या वेळी त्रास जाणवत असेल तर चुकूनही या पदार्थांचं करू नये.

काही महिला मासिक पाळीदरम्यान चहा किंवा कॉफीचं अतिसेवन करतात. मात्र कॅफेन तुमच्या त्रासाला वाढवू शकतं. त्याचसोबत यामुळे पोटात गॅस निर्माण होई शकतो. त्यामुळे अशा काळात चहा आणि कॉफीचं सेवन करणं टाळावं. यापेक्षा तुम्ही ग्रीन टी पिण्यास प्राधान्य देऊ शकता.

चॉकलेटच्या सेवनाने ही क्रॅम्स येतात. याचं कारण म्हणजे चॉकलेटमध्ये कॅफेनचं प्रमाण असतं. कॅफेनमुळे स्नायू आकुंचन पावतात. यामुळे पोटाची समस्या अधिकच बळावते. 

मासिक पाळीच्या काळात दारूसारखे पदार्थ पोटाच्या खालच्या बाजूला सूज वाढवतात. यामुळे वेदना वाढू शकतात. त्यामुळे या काळा अल्कोहोलचं सेवन करू नये.

पिरीयड्च्या दरम्यान थंड पदार्थ जसं की, दही, ताक, कोल्डड्रिंक यांचं सेवन करू नये.  यामुळे पोटात सूज वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे लोणचं, लिंबू आणि इतर आंबट गोष्टी खाऊ नये.

महिलांनी या दिवसांमध्ये जंक फूडपासूनही लांब रहावं. पिरीयड्समुळे शरीरात ब्लड लॉस होतो. त्यामुळे यावेळी शरीराला पोषक घटकांची गरज असते. म्हणूनच अशा दिवसांमध्ये हेल्दी आणि लाईट फूड खाल्लं पाहिजे.