वर्कींग वूमन्सना घेरतात आरोग्याच्या या ६ गंभीर समस्या!

घर, ऑफिस अशी तारेवरची कसरत करत असताना महिलांचे आरोग्याकडे अगदी दुर्लक्ष होते. 

Updated: May 16, 2018, 08:54 AM IST
वर्कींग वूमन्सना घेरतात आरोग्याच्या या ६ गंभीर समस्या! title=

मुंबई : घर, ऑफिस अशी तारेवरची कसरत करत असताना महिलांचे आरोग्याकडे अगदी दुर्लक्ष होते. आणि कालांतराने आरोग्याच्या अनेक समस्या डोके वर काढू लागतात. त्याकडेही फारसे लक्ष न पाहिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. म्हणून आरोग्याकडे वेळीच लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक ताणाला सामोर जावे लागते. कारण महिलांवर ऑफिस व्यतिरिक्त इतर कामांचीही जबाबदारी असते. त्याचबरोबर प्रत्येक काम योग्य पद्धतीने निभावण्याचा दबाव असतो. पण महिलांनी कामाच्या रगाड्यात दबून न जाता पूर्ण झोप घेणे आणि नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. 

 वजन वाढणे

वर्किंग व्यूमन्सना वजन वाढीची समस्या अधिक असते. त्यापासून सुटका मिळवणे कठीण होते. वजन अधिक असल्यास आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवतात. हृदयाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी भरपूर पाणी प्या आणि गरजेप्रमाणे प्रोटीन्स घ्या. नियमित व्यायाम करा. मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे. गोड आणि मिठाचे प्रमाण कमी करावे. गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून त्याचे सेवन करा. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

मायग्रेन 

वर्किंग व्यूमन्सना मायग्रेन होण्याची शक्यता असते. यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयी बदला. ऑफिसमध्ये काम करताना मध्ये मध्ये ब्रेक घेत रहा. 

रक्तदाब

ऑफिसमधील कामात अधिक शारीरिक श्रम नसल्याने वजन वाढीचा धोका असतो. यामुळे शरीर आणि रक्तात कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तदाबाची समस्या जन्म घेते. धुम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन ही समस्या गंभीर करते. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या सवयीकडे विशेष लक्ष द्या. कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवण्यासाठी तळलेले, मसालेदार पदार्थ आणि फास्ट फूड खाणे टाळावे. नियमित व्यायाम करावा.

मधुमेह

तरुणाई अनेकदा फास्ट फूड खाणे पसंद करते. त्यामुळे वजन वाढते. प्रोटीन- फायबर कमी घेतल्याने आणि फास्ट फूडच्या अधिक सेवनाने शरीरातील ग्लूकोज वाढते. परिणामी मधुमेहाला सामोरे जावे लागते. त्यामुळे शुगर नियमित तपासत रहा. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

हाडे कमजोर होणे

ऑफिसमध्ये खुर्चीवर चुकीच्या स्थितीत बसल्याने ऑस्टियोपोरोसिस समस्या उद्भवू शकते. यात हाडे कमजोर होतात आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता अधिक वाढते. यासाठी पोषक आहार घ्या. कॅल्शियम आणि व्हिटॉमिन डी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. हिरव्या पालेभाज्या, दुग्ध उत्पादने, मासे अवश्य खा. काम करताना मध्ये मध्ये ब्रेक घेत रहा. वॉक घ्या. योगासने किंवा व्यायाम करा.