मुंबई : महिला असो किंवा पुरुष आजकाल सर्वांची एकच तक्रार असते ती म्हणजे वजन वाढल्याची. यासाठी आपण विविध पर्यायांचा वापर करतो. यावेळी अनेकांना कामाच्या ताणामुळे जीमला जाण्यास वेळ मिळत नाही. अशावेळी स्थूलता वाढण्याची अधिक शक्यता असते. मात्र असं होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला घरच्या घरी करणाऱ्या एक्सरसाइजबद्दल माहिती देणार आहोत.
जाणून घेऊया घरच्या घरी करता येणाऱ्या एक्सरसाइज
हा व्यायाम घरच्या घरी सहज करता येतो. त्यामुळे तुमच्या शरीराचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे वजन उचलण्याची क्षमता वाढते आणि कंबरही मजबूत होते. हे मेटाबॉलिझम मजबूत करतं आणि शरीरात लवचिकता आणतं.
मॉर्निंग वॉक हा तुमच्या शरीराच्या आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे. प्रत्येकाने सकाळी 10 ते 15 मिनिटं फिरायला गेलं पाहिजे. चालण्याने तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. तसेच तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी घामाच्या रूपात बाहेर पडते.
बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही घराच्या पायऱ्यांचा वापर करू शकता. पोटाची चरबी कमी करण्याचा हा एक अतिशय सोपा आणि किफायतशीर मार्ग आहे. तुम्हाला फक्त 10 मिनिटं पायऱ्या चढून खाली उतरायच्या आहेत.