मुंबई : ऑफिसच्या ठिकाणी दिवसाची सुरूवात एनर्जीने झाली तरीही कालांतराने मरगळ येते. कामाच्या ठिकाणी ताण किंवा दुपारच्या वेळेस अतिजेवण झाल्यास झोप येते. मग पुढील सारीच कामं रेंगाळतात. मग पहा या झोपेवर कशी मात कराल ?
स्ट्रेचिंग केल्याने रक्ताभिसरण सुधारते. मात्र स्ट्रेचिंग करताना दुखापत होणार नाही याची काळजी घ्या.
नारळाचं पाणी प्यायल्याने दिवसभराची एनर्जी टिकून राहण्यास मदत होते. क्षीण कमी करायचा असेल तर ग्रीन टी किंवा नारळाचं पाणी प्या.
धनधान्यांचा आहारात समावेश वाढवा. यामुळे शरीरात एनर्जी टिकून राहण्यास मदत होते.
पेपरमिंट ऑईल मनगटाला लावा. या तेलामधील गुण तुम्हांला शांत ठेवण्यास, कामावर लक्ष केंद्रीत करण्यास मदत करतात.
७-८ तास सलग बसून राहण्याची सवय ठेवा. कामाच्या दरम्यान वेळ काढून काही नियमित चाला. चालण्याचा व्यायाम शरीरात एन्डॉरफिन हार्मोन्सला चालना देण्यास मदत करतात.