ऑफिसमध्ये सतत बसल्याने होणारी गुडघेदुखी 'अशी' करा दूर!

आपल्यापैकी बहुतांश जणांचे काम हे बैठे असते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 20, 2018, 02:35 PM IST
ऑफिसमध्ये सतत बसल्याने होणारी गुडघेदुखी 'अशी' करा दूर! title=

नवी दिल्ली : आपल्यापैकी बहुतांश जणांचे काम हे बैठे असते. त्यामुळे दिवसभर आपण खुर्चीवर बसलेले असतो. नाश्ता, जेवणानंतरही आपण लगेचच कामाला लागतो. त्यामुळे आपले स्थानू आखडले जातात. त्याचबरोबर एकाच स्थितीत दिवसभर बसल्याने गुडघ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. म्हणून त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. कामाच्या नादात त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे २ मिनीटांचा वेळ काढून गुडघ्याच्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास पुढील त्राल टाळता येतील. 

त्यासाठी काही टिप्स...

  • गुडघ्यांच्या दुखण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी रोज कोमट पाण्याने अंघोळ करा.
  • सात्विक, संतुलित आहार घ्या.
  • फास्ट फूट शक्यतो टाळा. त्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रोलची पातळी वाढणार नाही.
  • दिवसातून एकदा कमीत कमी १५ मिनिटे गरम पाण्यात पाय बुडवून बसा. यावेळेस तुमच्या पायांना हवा लागणार नाही याची काळजी घ्या.
  • ऑफिसमध्ये लंच ब्रेकमध्ये ५ मिनीटे तरी चाला किंवा फिरा.
  • ऑफिसमध्ये काम करताना मध्ये मध्ये पाय स्ट्रेच करा.