Vitamin B12 : तंदुरूस्त राहण्यासाठी आपल्या शरीराला व्हिटॅमीनची ( Vitamin B12 ) आवश्यकता असते. यामधील सर्वात महत्त्वाचं व्हिटॅमीन ( Vitamin B12 ) म्हणजे बी 12. प्रत्येकाच्या शरीराला एका ठराविक प्रमाणात बी 12 ची गरज असते. जर तुमच्या शरीरात पुरेसा प्रमाणात बी 12 नसेल तर तुम्हाला अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एका अहवालानुसार, तब्बल 47 टक्के लोकांच्या शरीरामध्ये व्हिटॅमीनची ( Vitamin B12 ) कमतरता असते.
भारतात करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, व्हिटॅमीन बी 12 ( Vitamin B12 ) केवळ 26 टक्के लोकसंख्येमध्ये योग्य प्रमाणात आहे. याचाच अर्थ भारतीय लोकांच्या शरीरामध्ये व्हिटॅमीन बी 12 ( Vitamin B12 ) ची कमतरता असल्याचं दिसून येतंय.
व्हिटॅमिन बी 12 आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यात मदत करतं. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमीन बी 12 ची कमतरता असेल तर व्यक्तीला अनावश्यक थकवा, अशक्तपणा, अशक्तपणा आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. यावेळी काही रूग्णांना त्यांच्या वजनात देखील बदल जाणवू शकतो.
व्हिटॅमीन बी 12 ( Vitamin B12 ) च्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या जाणवू नये यासाठी आपल्या प्रत्येकाला किती प्रमाणात व्हिटॅमीन बी 12 ( Vitamin B12 ) ची गरज असते, हे जाणून घेतलं पाहिजे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, जर एखाद्या प्रौढ व्यक्तीच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ( Vitamin B12 ) ची पातळी 300 pg/mL पेक्षा जास्त असेल, तर व्हिटॅमिन B12 ची पातळी 200-300 pg/mL पर्यंत असेल तर ते सामान्य मानलं जातं. जर ही पातळी 200 pg/mL च्या खाली असेल तर ती कमी मानली जाते.
तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, अनहेल्दी डाएट आणि काही मेडिकल कंडीशनमुळे एखाद्या व्यक्तीमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असण्याची शक्यता असते. यावेळी काही खास गोष्टींचा आहारात समावेश करून त्याचे प्रमाणही वाढवता येते. त्यामुळे जर तुमच्या शरीरात व्हिटॅमीन बी 12 ची कमतरता असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावेत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)