Side Effects of Tight Jeans: आजकालची फॅशन झपाट्यानं वाढते आहे. त्यातून आपल्या सर्वांना जीन्स घालणं प्रचंड आवडतं. पुरूषांमध्ये तर जीन्स घालण्याचं प्रमाण फारच जास्त आहे. तेव्हा जाणून घेऊया नक्की ही जीन्स पुरूषांना कशी त्रासदायक ठरू शकते. जीन्स घालण्याची सवय सर्वांनाच असते. त्यातून डेनिमची क्रेझ तर प्रत्येकाला आहेच. जीन्स घातल्यावर तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी एकदा ही बातमी वाचाच. (wearing tight fitting jeans can cause many health problem and side effect Know)
आज लूझ जीन्सचीही फॅशन आहे, परंतु टाईट जीन्स घालतानाही तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा जाणून घेऊया की टाईट जीन्स घातल्याचे तोटे काय आहेत ते. बाजारात अनेक प्रकारच्या जीन्स उपलब्ध असतात त्यातून तरूण मुलांना जीन्स या जास्त आकर्षित करतात. पण जीन्स विकत घेतल्यावर तुम्हाला योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा त्यामुळे शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात.
आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'
इन्फर्टिलिटीची समस्या (Infertility Problem)
घट्ट जीन्स घातल्याने स्नायू आणि नसांची उष्णता वाढते. यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता भासू लागते. कारण घट्ट जीन्स घातल्याने मांड्याभोवती खूप दाब वाढतो. यासोबतच रक्ताभिसरणातही समस्या निर्माण होतात. त्यामुळे खूप घट्ट जीन्स घालणे टाळा.
त्वचा विकार आणि मज्जातंतूची समस्या (Skin and nervous system problem)
घट्ट जीन्स घातल्याने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, इतकेच नाही तर खूप घट्ट जीन्स घातल्याने रक्ताभिसरण आणि मज्जासंस्थेवरही परिणाम होतो. कारण जास्त घट्ट जीन्स घातल्याने जीन्स तुमच्या मांडीला जास्त काळ चिकटून राहते, त्यामुळे चिडचिड आणि बुरशीचे संक्रमण वाढण्याची शक्यता असते.
आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे
प्रायव्हेट पार्टला होऊ शकतो त्रास (Private part injury)
पुरुषांनी घट्ट जीन्स घालणे चांगले मानले जात नाही. जर तुम्ही जास्त काळ घट्ट जीन्स घातली तर तुमच्या प्रायव्हेट पार्टजवळील रक्ताभिसरण थांबू शकते. त्यामुळे या भागाचेही नुकसान होऊ शकते.
कशी घ्याल खबरदारी? (precurations after wearing tight jeans)