मुंबई : धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांना व्यायाम करायलाच मिळत नाही. काहींना सकाळी उठता येत नाही तर काहींना वेळ नसतो. अशा स्थितीत वजन वाढतेच. पण जर असा व्यायाम असेल, ज्यासाठी तुम्हाला कसलीही मेहनत घ्यावी लागणार नाही, तरीही वजन कमी होत असेल, तर किती बरं होईल. चला तर मग, आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही व्यायाम घेऊन आलो आहोत, जे करणे तुम्हाला खूप सोपे जाईल आणि तुम्ही ते आरामात करू शकता.
Dead bugs
हा व्यायाम केल्याने पोट, कंबर आणि पायावरील चरबी झपाट्याने कमी होते. हा व्यायाम करण्यासाठी, बेडवर आरामात झोपा. मग गुडघे वाकवा. दोन्ही पाय हिप्सपासून एक फूट अंतरावर ठेवा. मग तुमचा उजवा पाय शक्य तितका पुढे पसरवा. यानंतर हा व्यायाम डाव्या पायाने करा. सर्वोत्तम परिणामांसाठी, दिवसातून किमान दोनदा 10 मिनिटे व्यायाम करा.
Glute Bridges
हा व्यायाम पायांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी ओळखला जातो. सर्वप्रथम बेडवर आरामात झोपा. त्यानंतर पायाचा तळवा बेडवर ठेवा आणि गुडघा वाकवा. आता तुमचे हिप्स काही सेकंद वरच्या दिशेने वर ठेवा. मग हिप्स खाली करा. हे 10 वेळा करा.
Leg Raises
पाय उंचावण्याचा व्यायाम केल्याने पोटावरील चरबी कमी होते. हा व्यायाम करण्यासाठी, बेडवर आपल्या पाठीवर आरामात झोपा आणि आपले पाय सरळ करा. आता पाय वर उचला आणि त्यांना 60 अंशांवर आणून ताणा. मग पाय परत बेडच्या दिशेने आणा. फक्त लक्षात ठेवा की आपले पाय ठेवताना ते बेडला स्पर्श करू नये.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)