Déjà vu : जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता, तेव्हा आपण इथे यापूर्वीही आलोय असं तुम्हालाही जाणवतं का? म्हणजे आपल्यासोबत आता जे काही घडत आहे ते यापूर्वीही घडलंय असं तुम्हाला वाटतं का? असं होणं अतीसामान्य आहे. यासाठी एक विशेष नावही आहे. या सर्व गोष्टी आणि या घडामोडी मेमरी इल्यूजन (memory illusion) शी संबंधित एका वैज्ञानिक सिद्धांतावर आधारलेल्या आहेत. या सिद्धांताला Déjà vu असं म्हणतात.
Déjà vu म्हणजे काय?
Déjà vu हा एक फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ ‘आधीही पाहिलेलं...’ असा होतो. ही प्रक्रिया होत असताना एखाद्या व्यक्तीला आपण तिच घटना यापूर्वी पाहिल्याचा किंवा अनुभवल्यासा भास होतो किंवा जाणीव होते. Déjà vu शी संबंधीत घटनांचा संबंध Time Travel शी असतो.
इथं एक घटना दोन भागांमध्ये विभागली जाते. हे दोन्ही भाग एकमेकांहून पूर्णपणे वेगळे असतात. एक भाग वेगळा असतानाच दुसरा भाग वेळ आणि काळाशी संबंधित असतो. ज्यामुळं त्या व्यक्तीला या घटना दुसऱ्यांदा घडत आहेत असं वाटतं. सोप्या शब्दांत सांगावं तर Déjà vu मध्ये व्यक्तीला वर्तमानात सुरु असणाऱ्या घटना त्यांच्यासोबत भूतकाळातही घडल्याचा भास होतो.
विज्ञान Déjà vu विषयी काय सांगतं?
वैज्ञानिक आणि अभ्यासकांच्या मते आपला मेंदू दोन भागांमध्ये विभागलेला असतो. एक भाग शरिराच्या डाव्या, तर दुसरा शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रणात ठेवत असतो. आपण जेव्हा थकतो तेव्हा मेंदूच्या दोन्ही भागांना संकेत एकाच वेळी पोहोचू शकत नाही. असं एका सेकंदासाठी झालं तरी, आपला मेंदू त्या घटना आपल्यासोबत आधीही घडल्या आहेत असा विचार करु लागतो. थोडक्यात हेच ते Déjà vu. त्यामुळं आपण पाहिलेली स्वप्न खरी होतात, असं म्हणण्यापूर्वी त्यामागची ही कारणं कायम लक्षात ठेवा.