मुंबई : कामाचा थकवा, सुस्ती दूर करण्यासाठी अनेकजण कॉफी पितात. चहा-कॉफीच्या अधिक सेवनाने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे मर्यादीत स्वरुपात त्याचे सेवन करा. दिवसभरात १-२ कॉफी पिण्यास काही हरकत नाही. पण अधिक सेवनामुळे अनिद्रा, चिंता, सारखी लघवी येणे, अशा समस्या उद्भवू शकतात. पहा अधिक प्रमाणात कॉफी प्यायल्याने काय नुकसान होते.
बाळासाठी प्लॅनिंग करत असाल तर कॅफेनपासून दूर रहा. कॅफेनमुळे रक्त वाहिन्या आकुंचित पावतात. त्यामुळे रक्तप्रवाह नीट होत नाही. परिणामी गर्भातील बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
कॅफेनच्या अत्याधिक सेवनाचा परिणाम स्पर्म काऊंटवर होतो.
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी कॅफेनचे सेवन कमी करा.
कॅफेनयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात घेतल्याने शरीरात वॉटर रिटेंशन होऊ लागते. सूज येते. त्यामुळे जाडेपणा येतो. त्याचबरोबर भूकही कमी लागते. त्यामुळे वेळेवर खाल्ले जात नाही आणि या सगळ्याचा परिणाम मेटाबॉलिझमवर होतो.
कॅफेनच्या अधिक सेवनामुळे सारखी लघवीला होते. त्यामुळे शरीरातील कॅल्शियम कमी होऊ लागते. परिणामी हाडांचे आरोग्य बिघडते. दिवसभरात २ कप पेक्षा अधिक कॉफी प्यायल्याने हाडांचे नुकसान होऊ लागते.